अनन्यामध्ये दिसणार वाघाचा Swag; महाराष्ट्राच्या क्रशसोबत झळकणार अभिनेता
अनन्यामध्ये दिसणार वाघाचा Swag; महाराष्ट्राच्या क्रशसोबत झळकणार अभिनेता
झोंबिवली फेम बहारदार अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh new project) हा एका खास प्रोजेक्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर येतोय. त्याचा हा खास प्रोजेक्ट नेमका काय आहे?
मुंबई 29 जून: अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) गेले अनेक दिवस प्रकाशझोतात आहे. एकामागून एक हिट ठरणाऱ्या कलाकृतींचा अमेय एक महत्त्वाचा भाग ठरत असल्याने साहजिकपणे तो हेडलाईनमध्ये असतो. नुकत्याच रिलीज झालेल्या अनन्या (Ananya marathi movie trailer) या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरची बरीच चर्चा होताना दिसत आहे. तुम्ही जर ट्रेलर नीट पाहिला असेल तर त्यात अमेयची सुद्धा शेवटी एंट्री होते हे तुम्हाला माहित असेल. पण अमेयचा फक्त कॅमिओ नसून तो या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग असणारे.
अमेयने काहीच दिवसांपूर्वी त्याच्या प्रोजेक्टबद्दल तो मोठी अनाउन्समेंट करणार आहे अशी माहिती दिली होती. आणि नुकताच तो अनन्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून आला. पण तो ट्रेलरच्या एकदम शेवटी दिसून आला असल्याने अनेकांना त्याची अगदी लहानशी भूमिका असेल असं वाटत होतं. पण मराठीतील एवढा उत्तम सिनेमा आणि त्यात हा अभिनयच वाघ फक्त छोटासा कॅमिओ करेल असं कुठे असतं का राव! अमेय या चित्रपटात एक महत्त्वाचं पात्र आहे असं म्हणलं जात आहे.
त्याच्या या सिनेमातील पात्राबद्दल बरीच गुप्तता बाळगण्यात आली आहे. खुद्द अमेय सुद्धा मुलाखतींमध्ये खुलून आपल्या पात्राबद्दल सांगत नाहीये. जय दीक्षित असं त्याच्या पात्राचं नाव आहे. अनन्याच्या ट्रेलर लाँच दिवशी सुद्धा तो बराच सक्रिय दिसत होता. त्याने राजश्री मराठीशी बोलताना सांगितलं, ‘मी खरंच आत्ता माझ्या भूमिकेबद्दल फार बोलू शकत नाही. जसं ट्रेलरमध्ये दिसत आहे तसाच मी एक सरप्राईज एलिमेंट असणार आहे. मुळात या चित्रपटाची कथाच फार महत्त्वाची आहे मी तर फक्त एक सरप्राईज एलिमेंट आहे.
असं म्हणलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते पण मला असं वाटत की प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे एक पुरुष असतो जो तिच्याकडून प्रेरणा घेऊन शिकत असतो. माझं पात्र हा असाच एक पुरुष आहे जो अनन्याच्या मागे उभा राहून तिचा प्रवास बघतोय आणि तिच्याकडून इन्स्पिरेशन घेतोय.’
हे ही वाचा- Santosh Juvekar: संतोषच्या लिस्टमध्ये आणखी एका सिनेमाची भर, शूटिंग संपताच टिमसाठी खास पोस्ट!
अनन्या ही एक एकांकिका होती, त्यानंतर त्याचं एक व्यावसायिक नाटक झालं आणि आता त्या कथेवर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमामधून अभिनेत्री हृता दुर्गुळेचा डेब्यू सुद्धा होणार आहे. सध्या मराठी चित्रपटाला खूप चांगले दिवस आले असल्याने अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतील असा आशावाद अमेयने व्यक्त केला आहे.
Published by:Rasika Nanal
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.