'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अमृता फडणवीस यांचं खास गाणं, पाहा हा VIDEO

व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळी त्यांनी हे गाणं आपल्या अधिकृत फेसबुक आणि युट्यूबवर शेअर केले आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळी त्यांनी हे गाणं आपल्या अधिकृत फेसबुक आणि युट्यूबवर शेअर केले आहे.

  • Share this:
    मुंबई, 15 फेब्रुवारी : आपल्या युनिक आवाजामुळे आणि या ना त्या मुद्यावरून शिवसेनेवर (Shivsena) टीका करणाऱ्या भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांनी आता व्हॅलेंटाईन डे (velntainday day) च्या निमित्ताने एक खास गाणं प्रसिद्ध केले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळी त्यांनी हे गाणं आपल्या अधिकृत फेसबुक आणि युट्यूबवर शेअर केले आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याचं छंद आहे. त्यामुळे वेगवेगळ्या मुद्यांवर, तर कधी कधी सामाजिक विषयांवर अमृता फडणवीस यांनी अनेक गाणी सादर केली आहे. यावेळी मात्र, व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने अमृता यांनी खास गाणे सादर केले आहे. 'ये नयन डरे डरे' असं या गाण्याचे नाव आहे. एका समुद्र किनाऱ्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. त्यांच्या या नव्या गाण्याचे सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांनी स्वागत केले आहे. दोन दिवसांपूर्वीच व्हॅलेंटाईन वीकमध्ये अमृता यांनी रेड गाऊनमधील शेअर केलेल्या फोटोची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली होती. रेड गाऊनमधील काही फोटो शेअर करत त्यांनी फोटोला एक कॅप्शनही दिलं. त्या कॅप्शनमधून त्या काहीतरी नवीन घेऊन येत असल्याचं सूचवलं होतं. अखेर व्हॅलेंटाईन डेच्या संध्याकाळी त्यांनी हे खास गाणं रिलीज केले आहे. याआधी सुद्धा अमृता फडणवीस त्यांच्या गाण्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत होत्या. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुद्धा अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. 'फिर से' या गाण्याचं लाँचिंग खुद्द अमिताभ बच्चन यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं होतं.
    Published by:sachin Salve
    First published: