त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ते म्हणाले, “...परवाच्या पोस्ट आणि बातमीनंतर अनेकांचे काळजी आणि सदिच्छा व्यक्त करणारे फोन व मेसेज आले.. आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि महाराजांचे आशिर्वाद यामुळे मी सुखरूप आहे. कोणतीही गंभीर दुखापत नाही. Michael Jackson Death Anniversary: ‘किंग ऑफ पॉप’चं 3 हजार कोटींचं घर आतून दिसतं कसं? पण परवा केलेल्या पोस्टवर कोणीतरी फार सुंदर प्रतिक्रिया दिली- महाराज निभावून नेतील! आणि काल आराम करताना अनेक प्रसंगांची मालिकाच डोळ्यासमोर तरळून गेली.. आणि वाटलं हो महाराजांनी निभावून नेलं. आभासी प्रतिरूप साकारताना आपण हातचं राखून ठेवलं नाही की "ते" चैतन्य निभावून नेण्यात हातचं राखत नाही! काहींनी हा व्हिडिओ पाहण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून शेअर करतोय. विशेषतः शूटिंग विषयी किरकोळीत आणि शेलक्या विशेषणांसह व्यक्त होणाऱ्यांनी आणि एखाद्याच्या शिवशंभू भक्तीविषयी शंका उपस्थित करणाऱ्यांनी तर आवर्जून पहावा! दिसतं आणि वाटतं तेवढं सगळं सोपं नसतं! अर्थात कोणाच्या म्हणण्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही.. महाराजांचं काम "ते" प्रेरणा देत राहतील तोवर सुरूच राहील! जय शिवराय!!!”View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.