जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मुलांना द्यायची हातपाय तोडण्याची धमकी

अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मुलांना द्यायची हातपाय तोडण्याची धमकी

अभिनेत्री पायल रोहतगीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मुलांना द्यायची हातपाय तोडण्याची धमकी

शेजाऱ्यांना धमकी देण्याच्या आरोपात पोलिसांनी तिला अटक केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 25 जून**:** बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी (Payal Rohatgi) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. अगदी राजकीय घडामोडिंपासून बॉलिवूडमधील घराणेशाहीपर्यंत विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. मात्र यामुळं अनेकदा ती गोत्यात देखील आली आहे. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा घडला. (Payal Rohatgi arrested) यावेळी शेजाऱ्यांना धमकी देण्याच्या आरोपात पोलिसांनी तिला अटक केली आहे. Michael Jackson Death Anniversary: ‘किंग ऑफ पॉप’चं 3 हजार कोटींचं घर आतून दिसतं कसं? मिळालेल्या माहितीनुसार पायलनं राहत्या सोसायटीमधील रहिवास्यांना अश्लील भाषेत धमक्या दिल्या. त्यांना खोट्या आरोपांखाली तुरुंगात डांबण्याची धमकी देखील दिली. शिवाय सोसायटीच्या आवारात जी मुलं खेळताना दिसतील त्यांचे हात पाय तोडेन असं देखील ती म्हणाली. असे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. दरम्यान या आरोपांखाली अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

जाहिरात

“माझे वडील घोटाळेखोर आहेत, त्यांना तुरुंगात टाका”; अभिनेत्रीनं जन्मदात्याविरोधात ठोठावला कोर्टाचा दरवाजा यापूर्वी राजस्थान पोलिसांनी देखील पायलला अटक केली होती. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांच्याविषयीचा एक व्हिडीओ पायलनं तयार केला होता. या व्हिडीओमध्ये तिनं नेहरुंवर खोटे आरोप केले होते. या प्रकरणातून अद्याप तिची पूर्णत: सुटका झालेली नाही. दरम्यान आता तिनं आणखी एक वाद अंगावर ओढून घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात