जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अमिताभ बच्चन यांनी केलं ट्वीट, ‘माझा मुलगा माझा वारस नाही...’

अमिताभ बच्चन यांनी केलं ट्वीट, ‘माझा मुलगा माझा वारस नाही...’

अमिताभ बच्चन यांनी केलं ट्वीट, ‘माझा मुलगा माझा वारस नाही...’

मंगळवारी रात्री अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केलं ज्यात त्यांनी लिहिलं की, माझा मुलगा माझा वारस असणार नाही…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 डिसेंबर : अमिताभ बच्चन बॉलिवूडमधील असे अभिनेता आहेत जे वयाच्या 77 व्या वर्षीही तेवढ्याच जोमानं सिनेमांची शूटिंग करत आहेत. बिग बी होस्ट करत असलेला शो कौन बनेगा करोडपतीचा यंदाचा सीझन खूप हिट राहिला. त्यानंतर ते आता त्यांचा आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रच्या शूटिंगमध्ये बीझी आहेत. पण हे सर्व सुरू असतानाच त्यांनी पोलंड येथे झालेल्या त्यांच्या वडिलांच्या सन्मान कार्यक्रमासाठी हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारी रात्री त्यांनी एक ट्विट केलं ज्यात त्यांनी लिहिलं की माझा मुलगा माझा वारस असणार नाही… अमिताभ यांचं हे ट्वीट अनेकांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन याच्याशी जोडत आहेत. अमिताभ यांनी लिहिलं, ‘माझा मुलगा, मुलगा आहे म्हणून माझा वारस असणार नाही पण जो माझा वारस असेल तो माझा मुलगा असेल.’- हरिवंश राय बच्चन. आणि मी नेहमी हा प्रयत्न करतो की मी त्यांचा वारस होऊ शकेन. त्यांच्या या ट्विटचा संबंध मुलगा अभिषेकशी जोडला जात होता. मात्र अभिषेक आणि या ट्वीटचा काहीही संबंध नाही. तर अमिताभ यांच्या ट्वीटमधील त्या ओळी या त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या ओळी आहेत. ज्या त्यांनी अमिताभ आणि अजिताभ यांच्यासाठी लिहिल्या होत्या. अदा शर्माच्या BOLD लुकवर चाहते घायाळ, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

जाहिरात

अमिताभ बच्चन यांचे वडील आणि भारताचे महान कवी हरिवंश राय बच्चन यांना पोलंडमध्ये सन्मानित करण्यात आलं. याच कार्यक्रमाला अमिताभ यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी तिथले काही फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करताना लिहिलं, हा विदेशातील असा देश आहे जो माझ्या पूज्यनिय वडीलांना सन्मानित करणार आहे. एक मुलगा म्हणून माझ्यासाठी यापेक्षा दुसरी कोणतीच भाग्यशाली गोष्ट असू शकत नाही. व्यायामासोबतच अजय देवगण ‘या’ गोष्टीलाही देतो महत्त्व!

हरिवंश राय बच्चन यांना श्रद्धांजली देताना एक फोटोसोबतच अमिताभ यांनी युरोपमधील सर्वात जुन्या चर्चचे काही फोटो शेअर केले आहेत. चर्चमधील नक्षीकाम आणि सजावट खूपच सुंदर आहे. अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ‘ब्रह्मास्त्र’ व्यतिरिक्त ते ‘गुलाबो सिताबो’ आणि ‘चेहरे’ या दोन सिनेमात काम करत आहेत. VIDEO : SONY TV वर पुन्हा पुन्हा का दाखवतात ‘सूर्यवंशम’, अक्षयनं सांगितलं कारण

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात