काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या कमांडो सिनेमात विद्युत जामवाल सोबत अॅक्शन सीन करताना दिसलेली अभिनेत्री अदा शर्मा सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिनं नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहे. जे खूप व्हायरल होताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये अदा अॅनिमल प्रिंट मोनोकिनीमध्ये दिसून असून तिच्या या बोल्ड लुकवर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.
अदा शर्मा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. फॅशनच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते.
अदानं तिच्या या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत याला 'ग्लॅमरस सिरदर्द' असं नाव दिलं आहे.
अदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती काही दिवसांपूर्वीच कमांडो 3 मध्ये विद्युत जामवालसोबत स्क्रीन शेअर करताना दिसली होती. तिच्या व्यतिरिक्त या सिनेमांत गुलशन गुलशन देवैय्या आणि अंगिरा धर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
कमांडो फ्रांचायजीचे 2 सिनेमा 2013 आणि 2017 मध्ये रिलीज झाले होते. या दोन्ही सिनेमात विद्युत जामवाल लीड रोलमध्ये होता.