अजय देवगण ड्रिंक घेतो. सिगारेटही ओढतो. तरीही याचा वाईट परिणाम शरीरावर होऊ देत नाही, ते त्याच्या फिटनेस रुटीनमुळे... अजय नेहमी 45 मिनिटं ट्रेडमिलवर कार्डिओ एक्झरसाइज करतो. अजय रोज 50 पुशअप्स करतो. तसंच नियमित सूर्यनमस्कार घालतो. अजयचं म्हणणं असं की शरीर फक्त जिममध्ये नाही तर स्वयंपाकघरातही बनतं. अजय नाश्त्याला ओट्स, पाच अंड्यांमधला पांढरा भाग, लो फॅट दूध खातो. लंचमध्ये तो ग्रिल्ड चिकन आणि उकडलेले फ्रेंच बिन्स घेतो. डिनरमध्ये अजय देवगण ग्रिल्ड चिकन आणि अंडी पसंत करतो.