मुंबई, 18 डिसेंबर : अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘गुड न्यूज’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. अक्षय आणि त्याच्या टीमनं नुकतीच कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. यावेळी या सर्वानी या सेटवर खूप धम्माल तर केलीच पण अक्षय कुमारनं यावेळी सोनी टीव्हीवर अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ सिनेमा पुन्हा पुन्हा का दाखवला जातो याविषयी मोठा खुलासा केला आहे. अक्षयचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. कपिल शर्मा शोनं नुकताच 100 एपिसोडचा टप्पा गाठला. यावेळी या सेटवर अक्षय कुमार आणि त्याचा सिनेमा गुड न्यूजची टीम पोहोचली होती. याचा एक इन्स्टाग्राम व्हिडीओ आता समोर आला आहे. ज्यात अक्षय कुमार कपिल शर्माच्या टीमची खिल्ली उडवताना दिसत आहे. याची सुरुवात अक्षय अर्चना पूरन सिंहपासून करतो. अर्चना त्याला विचारते, अक्षय आता तू हा शो होस्ट करणार आहेस का यावर अक्षय म्हणतो, हो मी तुमच्याकडूनच शिकलो आहे की दुसऱ्यांची काम कशी बळकावायची. यावर अर्चनासह सर्वांनाच हसू अनावर होतं.
कोण आहे रोमान्सचा किंग? सलमान खान देतोय शाहरुखला टक्कर, पाहा VIDEO
अक्षय पुढे म्हणतो, शुमोना प्रत्येकवेळी कोणाचं ना कोणाचं कॅरॅक्टर घेऊन येते. मात्र आतापर्यंत ती चांगली कॉमेडीयन होऊ शकलेली नाही. ही या शोमधली चंकी पांडे आहे. त्यानंतर अक्षय कपिल आणि कृष्णाला टार्गेट करतो आणि म्हणतो, या दोघांनी मिळून सोनी टीव्हीला लुटलं आहे आणि इतकं लुटलं की त्यांच्याकडे सूर्यवंशम पुन्हा पुन्हा दाखवणं या व्यतिरिक्त काहीही राहिलेलं नाही. अर्थात हा विनोदाचा भाग होता आणि कॉमेडीमध्ये अक्षय सुद्धा कमी नाही.
करीनाने सासूलाच विचारला ‘त्या’ बिकिनी फोटोशूटवर प्रश्न, शर्मिला म्हणाल्या…
अक्षय कुमार आणि करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘गुड न्यूज’ हा सिनेमा 27 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा एक कॉमेडी ड्राम असून यात कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. साधारणपणे हा सिनेमा सरोगसी या विषयावर आधारित आहे. अरबाज खानमुळे मलायकाची मॉडेलसोबत होतायत भांडणं ?