मुंबई, 17 सप्टेंबर- बॉलिवूड कलाकार आणि त्यांच्या लाइफस्टाइलबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. सोबतच कलाकारांच्या आलिशान घराबाबत लोकांना फारच आकर्षण असतं. या यादीमध्ये सर्वात वर नाव येतं शाहरुख खानच्या ‘मन्नत’ आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचं. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाबत एक रंजक गोष्ट समोर आली आहे. नुकतंच बिग बीनी ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये आपल्या घराचं नाव प्रतीक्षा कसं पडलं याबाबत खुलासा केला आहे. बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमुळे प्रचंड चर्चेत असतात. या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजेशीर संवाद साधत असतात. दरम्यान अनेक लोक अमिताभ बच्चन यांच्याजवळ आपल्या इच्छा जाहीर करतात. तर काहींना बिग बीच्या आयुष्याबाबत काही रंजक गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. अमिताभ बच्चनसुद्धा मोठ्या प्रमाणात स्पर्धकांच्या इच्छा पूर्ण करत असतात. नुकतंच शोमध्ये 21 वर्षांचा प्राकथ शेट्टी हा तरुण सहभागी झाला होता. तो व्यवसायाने सीए आहे. याच्याशी संवाद साधताना अमिताभ बच्चन यांनी आपल्या घराबाबत एक किस्सा शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांनी खुलासा करत सांगितलं की, त्यांच्या आलिशान घराला ‘प्रतीक्षा’ हे नाव त्यांचे वडील कवी हरिवंश राय बच्चन यांनी दिलं आहे. त्यांच्या कवितेत एक ओळ आहे. ज्यामध्ये म्हटलं, याठिकाणी सर्वांचं स्वागत आहे, पण कुणाची प्रतीक्षा नाहीय’. अर्थातच स्वागत सर्वांचं आहे परंतु वाट कुणाचीही पाहिली जात नाहीय. अशाप्रकारे अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यामागचा रंजक किस्सा सध्या चर्चेत आला आहे.
**(हे वाचा:** Suhana Khan: शाहरुख खानच्या लेकीला भेटली आपलीच कार्बन कॉपी; दुबई व्हेकेशनचे फोटो आले समोर ) अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याबाबत लोकांना नेहमीच कुतूहल आहे. अनेक चाहते दूर वरुन येऊन या बंगल्याजवळ फोटो घेत असतात. मुंबईतील सर्वात खास बंगल्यांपैकी एक हा अमिताभ बच्चन यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला आहे. अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदाच आपल्या घराच्या नावाबाबत हा खुलासा केला आहे. त्यामुळे ‘प्रतीक्षा’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.