ना स्टारडम, ना स्टाइल, पहिल्या फोटोशूटच्या वेळी असे दिसायचे अमिताभ बच्चन; पाहा PHOTO

ना स्टारडम, ना स्टाइल, पहिल्या फोटोशूटच्या वेळी असे दिसायचे अमिताभ बच्चन; पाहा PHOTO

अमिताभ बच्चन यांनी 1969मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका मासिकासाठी फोटोशूट केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सेल्फ आयसोल्युशनमध्ये असतानाही सोशल मीडियावर मात्र बरेच सक्रीय आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधतातना दिसत आहे. ट्विटर असो वा इन्स्टग्राम बिग बी नेहमीच फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकतेच त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरलही होत आहेत. हे फोटो आहेत अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या वहिल्या फोटोशूटचे.

अमिताभ बच्चन यांनी 1969मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका मासिकासाठी फोटोशूट केलं होतं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतरचं त्यांचं हे पहिलं फोटोशूट होतं. हे फोटो पोस्ट करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिलं, '1969 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर एका मासिकासाठी माझं हे पहिलंच फोटोशूट होतं. हे मासिक खरं तर स्टार आणि स्टाइलसाठी ओळखलं जात असे. पण त्यावेळी ना मी स्टार होतो ना माझ्याकडे कोणती स्टाइल होती.'

ड्रग्सच्या नशेबद्दल संजय दत्तचा मोठा खुलासा, लॉकडाऊनमध्ये होतोय VIDEO VIRAL

या फोटोंमध्ये अमिताभ बच्चन ग्रीन कलरच्या आउटफिट्समध्ये दिसत होते. तसेच त्यावेळी त्यांचा लुक सुद्धा खूपच सिंपल होता. याशिवाय अमिताभ बच्चन यांनी सोशल आणखी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यातील एका फोटोमध्ये ते ऋषी कपूर यांच्यासोबत दिसत आहेत. ऋषी कपूर चार्ली चॅपलिनच्या वेशात दिसत आहेत.

सनी लिओनीही बघतेय लॉकडाऊन संपायची स्वप्न, Beach Look मधला हॉट फोटो केला शेअर

ऋषी कपूर यांच्यासोबचा हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहिलं, हा फोटो 'नसीब' सिनेमातील गाणं 'रंग जमके'च्या शूटिंग वेळचा फोटो आहे. ज्यात एका रेस्टॉरंटमध्ये आग लागल्याचं दाखवण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर त्यांच्याकडे 'ब्रह्मास्त्र', 'झुंड', 'चेहरे' आणि 'गुलाबो-सिताबो' एवढे सिनेमे आहेत. यातील झुंड या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून या सिनेमात ते कोचच्या भूमिकेत दिसणार आहेत.

(संपादन : मेघा जेठे.)

काय सांगता! शाहरूख या विकेंडला तुमच्या घरीच करणार डान्स, प्रियांकाही असणार सोबत

First published: April 15, 2020, 1:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading