• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • बिग बींची पान मसाला कंपनीवर कायदेशीर कारवाई, जाणून घ्या काय आहे कारण?

बिग बींची पान मसाला कंपनीवर कायदेशीर कारवाई, जाणून घ्या काय आहे कारण?

Amitabh Bachchan

Amitabh Bachchan

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 79 वा वाढदिवस साजरा करताना एक मोठा निर्णय घेतला होता.

 • Share this:
  मुंबई, 21 नोव्हेंबर: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 79 वा वाढदिवस साजरा करताना एक मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी आपल्या ब्लॉगद्वारे पान मसाला (Paan Masala) कंपनी 'कमला पसंद' शी आपला करार मोडत असल्याची घोषणा केली होती. याननंतर बिग बींना पान मसाला कंपनीवर पुन्हा निशाना साधला असून आता थेट कंपनीवर कायदेशीर कारवाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. अमिताभ यांची कमला पसंद या पान मसाला ब्रँडची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडीयावरुन त्यांना ट्रोल करण्यात आले. त्यांच्यावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यासर्वांची गंभीर दखल घेत बिग बींनी पान मसाला ब्रँडसोबतचा त्यांचा करार संपवण्याचा निर्णय घेतला.

  करार संपवूनही जाहिरात ऑनएयर

  मात्र, त्यांच्या या निर्णयानंतरही त्यांची ही जाहिरात टीव्हीवर दाखवण्यात येत आहे. करार संपवूनही पान मसालाची ती जाहिरात ज्यात अमिताभ आहेत ती ऑनएयर असल्या कारणास्तव बिग बींनी कंपनीवर कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आता कंपनीला नोटीस पाठवली आहे.

  रणवीर सिंहसोबत जाहिरातीत काम

  काही दिवसांपूर्वी अमिताभ आणि रणवीर सिंग यांनी एकत्र कमला पसंद या पान मसालाच्या जाहिरातीत काम केले होते. शाहरुख खान, अजय देवगन सारखी पान मसालाची जाहिरात केल्यामुळे अमिताभ यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी कमला पसंद या पान मसालाच्या ब्रँडसोबत करार संपवला. बायकोने केलेल्या मारहाणीच्या आरोपांवर अनिकेत विश्वासरावची प्रतिक्रिया... काही काळापूर्वी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष शेखर साळकर यांनी एक पत्र लिहिले होते, ज्यात असे म्हटले होते की पान मसाला लोकांच्या आरोग्यावर परिणाम करतो. तसेच बिग बी पल्स पोलिओ मोहिमेचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत, त्यामुळे त्यांनी ही पान मसालाची जाहिरात त्वरित सोडली पाहिजे. दरम्यान, गेल्या महिन्यात एका चाहत्याने अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर विचारले की त्यांनी अशा पान मसाल्याच्या ब्रँडला मान्यता देण्याचे का निवडले? त्याला उत्तर देताना ते म्हणाले होते – ‘प्रथम मी माफी मागतो. जर कोणी कोणत्याही व्यवसायात चांगले करत असेल, तर आपण त्याच्याशी का जोडले गेलो आहोत याचा विचार करू नये. अशा व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या व्यवसायाचाही विचार करावा लागतो. हे करून मला पैसे मिळतात.’ मात्र आता आपल्या वाढदिवसादिवशी अमिताब बच्चन यांनी आपण ही जाहिरात व तो ब्रँड सोडला असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मिडियावर अमिताब बच्चन यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: