• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • झी मराठीची नव्याने सुरू झालेली मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी मराठीची नव्याने सुरू झालेली मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

झी मराठी वाहिनीवरील एक सस्पेन्स थ्रिल मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे दिसून येत आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर- झी मराठी वाहिनीवरील एक सस्पेन्स थ्रिल मालिका लवकरच  प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे दिसून येत आहे. ही “ती परत आलीये” (ti parat aliy )ही मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 16 ऑगस्ट 2021 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता मात्र मालिकेला प्रेक्षकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने आणि टीआरपी कमी असल्याने ती परत आलीये ही मालिका अल्पावधीतच आटोपती घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. मालिकेच्या पहिल्या भागात सर्व मित्र एकत्रित येऊन सेलिब्रेशन करत असतात तिथेच या सर्वांची मैत्रीण निलांबरीला हे सर्वजण स्विमिंग पूलमध्ये फेकून देतात. निलांबरीला पोहोता येत नसल्याने दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसतो त्यावेळी हे सर्वजण घाबरून जातात. ही घटना घडून अनेक वर्षे लोटतात तेव्हा हेच सर्व मित्र पुन्हा एकदा एकत्र येतात पण ह्यावेळी ते कोणाच्या जाळ्यात सापडतात याचे गूढ मात्र अजूनही कोणालाच उलगडलेले नाही. वाचा : बायकोने केलेल्या मारहाणीच्या आरोपांवर अनिकेत विश्वासरावची पहिली प्रतिक्रिया... मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना एका जागेवर खिळवून ठेवण्यास सक्षम ठरली होती मात्र त्यानंतर मालिकेत अनेक घडामोडी घडत चाललेल्या दिसत आहेत. शिवाय मालिका लवकरच एका निर्णयावर येऊन पोहोचलेली पाहायला मिळत आहे. सायली, अभ्या, रोहिणी, अनुजा, हनम्या, विक्रांत, मॅंडी, बाबुराव, लोखंडे ही सर्व पात्र प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. नुकतेच या मालिकेतील हनम्याने एक्झिट घेतली आहे त्यामुळे त्याच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या मुखवटा घातलेल्या व्यक्तीच्या ते शोधात आहेत. ह्या सर्व घडामोडी कोणामुळे घडत आहे हेही लवकरच उघड होणार आहे.  या मालिकेच्या कथानकानुसार ही मालिका फक्त 100 भागांची आहे, अशी घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. यानुसारच मालिकेच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण पार पडले असल्यची माहिती देखील समोर आली आहे. वाचा : अभिजित बिचुकलेची Bigg Boss 15 मध्ये होणार वाइल्ड कार्ड एंट्री अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीतच मालिकेच्या निर्मात्यांना मालिका बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे या मालिकेच्या जागी आता कोणती नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष्य लागून राहिले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: