• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • बायकोने केलेल्या मारहाणीच्या आरोपांवर अनिकेत विश्वासरावची पहिली प्रतिक्रिया...

बायकोने केलेल्या मारहाणीच्या आरोपांवर अनिकेत विश्वासरावची पहिली प्रतिक्रिया...

मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात पत्नी स्नेहा विश्वासरावने घरगुती हिंसाचार आणि मारहाण केल्याबद्दल तक्रार केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर- मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासराव (aniket vishwasrao) आणि त्याच्या आई-वडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाणने घरगुती हिंसाचार आणि मारहाण केल्याबद्दल तक्रार केली आहे. याप्रकरणी पुण्ययातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीने लावलेल्या या गंभीर आरोपांवर अनिकेतने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनिकेतने पत्नीने लावलेले सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. अनिकेत या संपूर्ण प्रकरणावर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की,'आम्ही गेले अनेक महिने वेगळे राहत आहोत. ती पुण्यात असते तर मी मुंबईत असतो. आम्ही अजून कायदेशीररित्या वेगळे झालेलो नाही. त्याबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही. ते सगळं पुढे कळेलच. तिथे माझ्या विरोधात तिने काय केलंय याची मला काहीच कल्पना नाही. ती हे सगळं का करतेय हेदेखील मला कळत नाही. यापुढे मी अजून काही सध्या तरी सांगू शकत नाही' वाचा : अभिजित बिचुकलेची Bigg Boss 15 मध्ये होणार वाइल्ड कार्ड एंट्री अभिनेत्री स्नेहा चव्हाणने काय लावले होते आरोप अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने साधारण दोन दिवसांपूर्वी तिचा पती अनिकेत विश्वासराव याच्या विरोधात घरगुती हिंसाचार प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्नेहाने अनिकेतवर मारहाण केल्याचे आरोप ला​​वले होते. लग्नानंतर काही काळातच अनिकेतने पत्नी स्नेहाला मानसिक छळ करण्यास सुरुवात केली एवढेच नाही तर पाहुण्यांसमोर देखील तो तिला कमी लेखत असे. वाचा : 'जबरदस्त बंबात जाळच' : श्रुती मराठेच्या हॉट Photo वर सुपर हॉट कमेंट! आपली पत्नी आपल्या पेक्षा वरचढ ठरायला नको आपल्या पेक्षा लोकप्रिय ठरायला नको या हेतूने तो तिला कायम कमी लेखत असे, लोकांसमोर तो तिला अपमानास्पद वागणूक देत असे. मारहाण देखील करत असे. मारहाण करताना त्याने तिचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असे स्नेहाने आपल्या या तक्रारीत म्हटले होते. डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021यादरम्यान माझी छळवणूक झाली असल्याचे स्नेहाने अनिकेत वर आरोप लावले होते. स्नेहा या काळात पुण्यात असलेल्या तिच्या माहेरी दाखल झाली आणि तिने अनिकेत विरोधात तक्रार नोंदवली होती.
  Published by:News18 Trending Desk
  First published: