Home /News /entertainment /

Unlock 1.0 होताच ड्रम घेऊन दारू आणायला निघाले शक्ती कपूर, VIDEO पाहून आवरणार नाही हसू

Unlock 1.0 होताच ड्रम घेऊन दारू आणायला निघाले शक्ती कपूर, VIDEO पाहून आवरणार नाही हसू

शक्ती कपूर यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणालाच हसू आवरणार नाही.

  मुंबई, 10 जून : बॉलिवूडमधील ‘नंदू’ ही सर्वात विनोदी भूमिका साकारणारे आणि व्हिलनच्या भूमिकेत सर्व हिरोंना सळो की पळो करून सोडणारे अभिनेता शक्ती कपूर क्राइम मास्टर गोगो म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोग्रस्तांची संख्या पाहून त्यांनी काही दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती. जेव्हा लॉकडाऊन सुरू होतं त्यावेळी सर्वकाही बंद असताना काही लोकांनी दारूची दुकानं उघडण्याची मागणी केली होती. पण आता जेव्हा अनलॉक 1.0 झालं तेव्हा सरकारनं जनतेला काही सुविधांमध्ये थोडी शिथीलता दिली आहे. ज्यात दारूची दुकानं सुद्धा खुली करण्यात आली. अशात शक्ती कपूर यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणालाच हसू आवरणार नाही. क्राइम मास्टर गोगो म्हणजे शक्ती कपूर तितकेसे सोशल मीडियावर सक्रिय नसतात मात्र सध्याच्या काळात ते सोशल मीडियावर बरेच सक्रीय झाले आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ते मोठा ड्रम घेऊन घराच्या बाहेर निघताना दिसत आहेत. यावर व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती त्यांना विचारते, ‘कुठे निघालात?’ शक्ती कपूर यांनी उत्तर दिलं, दा’रू आणायला चाललो आहे.’ यावर ती व्यक्ती हसते आणि म्हणते, ‘ठिक आहे. पूर्ण सोसायटीसाठी घेऊन या’
  View this post on Instagram

  A post shared by Shakti Kapoor (@shaktikapoor) on

  शक्ती कपूर यांचा हा फनी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रवासी मजूरांचं दुःख पाहून एक इमोशनल गाणं गायलं होतं. ‘मुझे घर जाना हैं’ या गाण्याच्या काही ओळी त्यांनी गायल्या होत्या. गाताना त्यांनी म्हटलं, 'आया तो था धन कमाने लेकिन इस शहर में मुझे दुख ही दुख मिले अब मुझे इस शहर में नहीं है रहना मुझे घर है जाना'. याशिवाय काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, जेव्हा सर्व काही ठिक होईल आणि लॉकडाऊन संपेल तेव्हा मला माझ्या मुलांसोबत धार्मिक स्थळांना भेट द्यायची आहे. अनलॉक 1.0 मध्ये लोकांना घरातून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच दुकानं, मॉल, जिम आणि मंदिरं सर्वांसाठी उघडण्यात आली आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अद्याप घट झालेली नाही. ही संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मीकानं नॅशनल टेलिव्हिजनवर कनिका कपूरला म्हटलं होतं पत्नी, वाचा नेमकं काय घडलं भयानक अपघाताने बदललं अभिनेत्रीचं आयुष्य, चेहऱ्यात घुसले होते काचांचे 67 तुकडे
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Coronavirus, Shakti kapoor

  पुढील बातम्या