मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

भारतीय महिलांच्या सेक्शुअलिटीवर प्रश्न, ऐश्वर्या रायनं ओप्रा विन्फ्रेला दिलं सडेतोड उत्तर

भारतीय महिलांच्या सेक्शुअलिटीवर प्रश्न, ऐश्वर्या रायनं ओप्रा विन्फ्रेला दिलं सडेतोड उत्तर

2005 मध्ये ऐश्वर्याला ओप्रा विन्फ्रे शोमध्ये भारतीय महिलांची सेक्शुअलिटी, लग्न आणि त्यानंतरचे शारिरीक संबंध यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.

2005 मध्ये ऐश्वर्याला ओप्रा विन्फ्रे शोमध्ये भारतीय महिलांची सेक्शुअलिटी, लग्न आणि त्यानंतरचे शारिरीक संबंध यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.

2005 मध्ये ऐश्वर्याला ओप्रा विन्फ्रे शोमध्ये भारतीय महिलांची सेक्शुअलिटी, लग्न आणि त्यानंतरचे शारिरीक संबंध यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.

  मुंबई, 10 जून : अमेरिकेत काही दिवसांपूर्वी एका कृष्णवर्णीय व्यक्तीची एका श्वेतवर्णीय पोलीस अधिकाऱ्यानं गळा दाबून हत्या केली. त्यानंतर जगभरात पुन्हा एकदा रंगभेदावरुन लढाई सुरू झाली आहे. याबाबत अनेक प्रकरणं आता नव्यानं बाहेर येताना दिसत आहेत. अशात अनेक सोशल मीडिया पोस्ट, व्हिडीओ आणि मुलाखतीत चर्चेचा विषय ठरत आहेत. यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ त्यावेळचा आहे जेव्हा ऐश्वर्याचं लग्न सुद्धा झालं नव्हतं. 2005 मध्ये ऐश्वर्यानं अमेरिकन टीव्ही विश्वातला प्रसिद्ध शो ओप्रा विन्फ्रे शोमध्ये हजेरी लावली होती. या ठिकाणी तिला भारतीय महिलांची सेक्शुअलिटी, लग्न आणि त्यानंतरचे शारिरीक संबंध यावर अनेक प्रश्न विचारण्यात आले होते आणि ऐश्वर्यानंही तेवढ्याच आत्मविश्वासानं त्या प्रश्नांची उत्तर देत सर्वांची बोलती बंद करत देशाचा सन्मान वाढवला होता. या शोमध्ये ओप्रा विन्फ्रेनं ऐश्वर्याला भारतीय महिलांच्या सेक्शुअलविषयी चर्चा केली आणि अनेक गंभीर प्रश्नांवर हलक्या-फुलक्या पद्धतीनं चर्चा करण्यात आली होती. ऐश्वर्या रायनं त्यावेळी उत्तर देताना असे मुद्दे मांडले की स्वतः ओप्रा सुद्धा तिच्या या उत्तरानं प्रभावित झाली होती. भारतीय महिलांच्या सेक्शुअलिटी बद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाली, मी अशा भूमीतून आले आहे जिथे कामसुत्राची सुरुवात झाली आहे. पण भारतात आजही रस्त्याच्या कडेला बसून किस किंवा कोणत्याही प्रकारचे शारिरीक संबंध ठेवताना लोक दिसणार नाहीत. कारण शारिरीक संबंध ही गोष्टी भारतीयांसाठी फक्त शारिरीक गरज नाही तर भावनिक सुद्धा आहे. त्यामुळे या गोष्टी भारतात नेहमी खासगी ठेवल्या जातात. सार्वजनिक ठिकाणी त्याचं प्रदर्शन केलं जात नाही.
  या आधीही ऐश्वर्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एका अमेरिकन टीव्ही शोमध्ये तिनं भारतीय कौटुंबीक व्यवस्थेची खिल्ली उडवणाऱ्या सर्वांना सडेतोड उत्तर दिलं होतं. या शोमध्ये ऐश्वर्याला भारतात मुलं मोठी झाली तरीही आई-वडीलांसोबत राहतात हे सामान्य आहे का असं विचारण्यात आलं होतं. यावर ऐश्वर्यानं उत्तर दिलं, ‘ही गोष्ट भारतात खूपच सामान्य आहे आणि आम्हाला आमच्या आई-वडीलांसोबत डिनर किंवा लंच करण्यासाठी कधीच परवानगी घ्यावी लागत नाही.’ तिच्या या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली होती.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या