Home /News /entertainment /

मीका सिंहनं नॅशनल टेलिव्हिजनवर कनिका कपूरला म्हटलं होतं पत्नी, वाचा नेमकं काय घडलं

मीका सिंहनं नॅशनल टेलिव्हिजनवर कनिका कपूरला म्हटलं होतं पत्नी, वाचा नेमकं काय घडलं

मीकानं नॅशनल टेलिव्हिजनवर कनिका कपूरला आपली पत्नी म्हटलं होतं. त्यावेळी स्वतः कनिका सुद्धा हैराण झाली होती. पाहा त्यावेळी नेमकं काय घडलं...

    मुंबई, 10 जून : बॉलिवूडला अनेक हिट गाणी देणाऱ्या मीका सिंहचा आज वाढदिवस. मीका सिंहला जेवढं त्याच्या गाण्यांसाठी ओळखलं जातं तेवढाच तो वादांमुळे चाहत्यांच्या लक्षात राहिलेला आहे. बिनधास्त स्वभावाच्या मीकानं अनेकदा अशीच बिनधास्त विधानं केल्यानं वाद निर्माण झाले आहेत. पण खरा हंगामा तेव्हा झाला होता. जेव्हा बॉलिवूड सिंगर कनिका कपूर ही आपली पत्नी असल्याचं त्यानं ख्रिस गेलला सांगितलं होतं. मीकाच्या अशा बोलण्यानं स्वतः कनिका सुद्धा हैराण झाली होती. जाणून घेऊयात त्यावेळी नेमकं काय घडलं होतं... टीव्हीचा प्रसिद्ध कॉमेडी शो ‘कपिल शर्मा शो’मध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स हजेरी लावतात. या शोमध्ये अनेकचा कधीच न पाहिलेला धम्माल अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतो. जेव्हा मीकानं या शोमध्ये हजेरी लावली होती त्यावेळी त्यानंही खूप धम्माल केली होती. यावेळी त्याच्यासोबत सिंगर कनिका कपूर आणि प्रसिद्ध क्रिकेटर ख्रिस गेल सुद्धा आले होते आणि या शोमध्येच मीकानं नॅशनल टेलिव्हिजनवर कनिकाला आपली पत्नी म्हटलं होतं. ज्यामुळे कनिकाला आश्चर्याचा धक्का बसला होता. टीव्हीच्या 'संस्कारी बहू'चे बिकिनी PHOTO व्हायरल, बोल्ड अंदाजामुळे चाहते फिदा या शोमध्ये मीका सिंह ख्रिस गेलला पंजाबी शिकवत होता. मीकानं ख्रिस गेलला सांगितलं मी तुला पंजाबी शिकवणार आहे. त्यावर ख्रिसनं सहमती दर्शवली. यानंतर मीकानं त्याला सांगितलं आता मी सांगेन तसं म्हणायचं, ‘भाभी जी नमस्ते’ आणि त्यानं कनिकाकडे पाहिल. ख्रिस मीकानं सांगितल्याप्रमाणे बोलला त्यानंतर मीकानं त्याला याचा अर्थ सांगितला. कार रेसर झाली अडल्ट स्टार! 25 वर्षीय रेनीनं सांगितलं हा मार्ग निवडण्याचं कारण मीका म्हणाला या अर्थ असा होतो की, तु कनिकाला भाभी म्हटलं म्हणजे ती माझी पत्नी आहे आणि तू तिला हॅलो बोलत आहेस. यावर कनिकानं मीकाला थांबवत म्हटलं, ‘सांभाळून बोल, तू हे काय सांगतोयस.’ पण मीकानं तिला लगेच उत्तर दिलं, तू सिरिअस नको होऊ मी त्याला पंजाबी शिकवतोय तुझ्याशी लग्न नाही करणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्यांच्या मॅनेजरची आत्महत्या; 14 व्या मजल्यावरून मारली उडी मीकाचं बोलणं ऐकून सर्वांनाच हसू आलं. मीकानं पंजाबी गाण्यांपासून सुरुवात करून बॉलिवूड पर्यंतचा प्रवास केला आहे. मीकाचं खरं नाव अमरीक सिंह असं आहे. त्याचे वडील अजमेर सिंह आणि आई बलबीर कौर स्टेट लेव्हलचे रेसलर होते. मीका त्याच्या 6 भावंडांमध्ये सर्वात लहान आहे आणि तो पंजाबी आणि बॉलिवूड सिंगर दिलेर मेहंदी यांचा भाऊ आहे.
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood

    पुढील बातम्या