Home /News /entertainment /

करिनाचा प्रेग्नन्सीमधला Photo होतोय व्हायरल, काय आहे या मागचं खास कारण?

करिनाचा प्रेग्नन्सीमधला Photo होतोय व्हायरल, काय आहे या मागचं खास कारण?

करिना कपूर खानचं सैफची पहिली पत्नी अमृता सिंहच्या दोन्ही मुलांशी चांगलं बॉन्डिंग आहे.

  मुंबई, 7 मे : बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरनं काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवर एंट्री केली. तेव्हा पासून ती काही ना काही करणानं सोशल मीडियावर चर्चेत आहेच. सध्याच्या लॉकडाऊनमध्येही करिना सोशल मीडियावर सातत्यानं सक्रिय आहे. ती स्वतःसोबतच मुलगा तैमुर आणि सैफ अली खानचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण सध्या तिचा प्रेग्नन्ट असतानाचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिच्यासोबत सारा आणि इब्राहिम सुद्धा दिसत आहे. करिना कपूर खानचं सैफची पहिली पत्नी अमृता सिंहच्या दोन्ही मुलांशी चांगलं बॉन्डिंग आहे. सारा अनेकदा करिना तिची चांगली मैत्रीण असल्याचा उल्लेख करताना दिसते. अशात आता तिच्या थ्रोबॅक फोटोची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. या फोटोमध्ये करिना रेड कलरच्या लॉन्ग गाऊनमध्ये दिसत आहे. ज्यात तिच्या सोबत सारा आणि इब्राहिम सुद्धा दिसत आहेत आणि करिनानं इब्राहिमच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं पाहायला मिळत आहे.
  View this post on Instagram

  Pregnant bebo ❤

  A post shared by Bollywood Fan Page (@bollykifan) on

  सोशलम मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो करिनाच्या प्रेग्नन्सीच्या वेळचा आहे कारण त्यात करिनाचा बेबी बंप दिसत आहे. या फोटोचं विशेष म्हणजे सारा-इब्राहिम आणि करिनाचं बॉन्डिंग ज्यामुळे हा फोटो आजही चर्चेचा विषय आहे. सारा तर करिनासोबत अनेकदा दिसते मात्र या फोटोतून इब्राहिम आणि करिना यांच्यातही चांगलं बॉन्डिंग असल्याचं लक्षात येतं.
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Kareena Kapoor

  पुढील बातम्या