अरे बापरे! दिशा पाटनीला म्हणते, देवाने मला चार बॉयफ्रेंड दिले तर...

अरे बापरे! दिशा पाटनीला म्हणते, देवाने मला चार बॉयफ्रेंड दिले तर...

अभिनेत्री दिशा पाटनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तिनं तिच्या बॉयफ्रेंडचा उल्लेख केला आहे.

  • Share this:

मुंबई, 6 मे : कोरोना व्हायरसनं सगळीकडेच थैमान घातलं आहे. ज्यामुळे बरेच बॉलिवूड सेलिब्रेटी सिनेमाचं शूटिंग थांबवून घरी थांबलेले पाहायला मिळत आहे. नेहमीच काही नाही कारणानं बीझी राहणारे हे कलाकार सध्या मात्र निवांत असल्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. अशात अभिनेत्री दिशा पाटनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात तिनं तिच्या बॉयफ्रेंडचा उल्लेख केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिशा पाटनी म्हणते, खरं तर मला एकच बॉयफ्रेंड हवा आहे. पण जर देवानं मला चार किंवा त्यापेक्षा जास्त बॉयफ्रेंड दिले तर मी त्याला नकार देणारी कोण आहे. दिशाचा हा व्हिडीओ वूम्प्ला या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यावर दिशाचे चाहते कमेंट करताना दिसत आहेत आणि तिच्या या बिनधास्त अंदाजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती लॉकडाऊनपूर्वी रिलीज झालेल्या मलंग सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होता. तर अनिल कपूर, कुणाल खेमू आणि अमृता खानविलकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. लवकरच दिशा सलमान खानच्या 'राधे' सिनेमात दिसणार आहे. मात्र सध्या या सिनेमाचं शूटिंग लांबणीवर पडलं आहे त्यामुळे हा सिनेमा कधी रिलीज होणार याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

First published: May 6, 2020, 6:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading