Home /News /entertainment /

लॉकडाऊनमध्येही बाहेर फिरणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी सुनावलं...

लॉकडाऊनमध्येही बाहेर फिरणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी सुनावलं...

लॉकडाऊनध्ये बाहेर फिरताना अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला चांगलंच सुनावलं आहे

  मुंबई, 7 मे : चीनच्या वूहान शहरापासून सुरू झालेल्या या कोरोना व्हायरसनं सध्या जगभरात थैमान घातलं आहे. जगातले काही म्हणजे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढे देश सोडले तर बाकी इतर सर्व देशांना या व्हायरसनं विळखा घातला आहे. यापासून वाचण्यासाठी भारतासह इतर अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं ज्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी सिनेमांचं शूटिंग थांबवून घरी थांबले आहेत. पण असं असतानाही एक अभिनेत्री मात्र या लॉकडाऊनमध्येही घराबाहेर पडून फिरताना दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड सेलिब्रेटी सतत घरी राहा आणि स्वतःची काळजी घ्या असा सल्ला देत असताना अभिनेत्री नर्गिस फाखरी मात्र वारंवार घराबाहे पडताना दिसत आहे. एवढंच नाही तर तिनं याचे व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नर्गिस सध्या अमेरिकेच्या लॉस एंजलिस शहरात आहे. सध्या अमेरिकत कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असताना नर्गिस मात्र बिनाधास्त घराबाहेर फिरताना दिसत आहे. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक फोटो आणि व्हिडीओ तिनं शेअर केले आहेत. ज्यात तिनं लॉकडाऊनमध्ये मी हे शहर अधिक चांगल्या पद्धतीनं पाहू शकत असल्याचं म्हटलं आहे. आथियाने केएल राहुलला क्रॉप करून शेअर केला PHOTO, दोघात बिनसलं असल्याची चर्चा
  कोरोना विषाणूचा सगळीकडे हाहाकार माजला असताना आता हिला घराबाहेर पडण्याची काय गरज असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर नर्गिस तिच्या मित्र मैत्रिणींसोबत व्यायाम करण्यासाठी आणि बाहेर फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडते. ऐकून आश्चर्य वाटेल पण नर्गिसनं सायकलिंग करतानाचे आणि निसर्ग रम्य वातावरणात व्यायाम करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे ती लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडत असल्याचं समोर आलं. अरे बापरे! दिशा पाटनीला म्हणते, देवाने मला चार बॉयफ्रेंड दिले तर...
  नर्गिसचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तिला घरी राहण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. यासोबतच 'सध्याच्या परिस्थितीत असे स्टंट करण्यापेक्षा बाई तू घरीच थांब' असं नेटिझन्सनी तिला सुनावलं आहे. मध्यंतरी घरात भांडी घासत असताना नर्गिसचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय ती टिकटॉकवरही खूप सक्रिय असलेली पहायला मिळत आहे. (संपादन- मेघा जेठे.) लॉकडाऊनमध्ये मलायकाला अर्जुन नव्हे तर मग कोणाची येतेय आठवण, पहा PHOTO
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या