मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

KBC14: केबीसीच्या मंचावर स्पर्धकाचा संघर्ष ऐकून अमिताभ निःशब्द; शिक्षिकेची केली देवाशी तुलना

KBC14: केबीसीच्या मंचावर स्पर्धकाचा संघर्ष ऐकून अमिताभ निःशब्द; शिक्षिकेची केली देवाशी तुलना

KBC14

KBC14

'कौन बनेगा करोडपती 14' शोच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये अमिताभ काहीसे भावुक झालेले पाहायला मिळाले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई,  27 सप्टेंबर : सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा अमिताभ बच्चन यांचा क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती 14' दिवसेंदिवस मजेशीर होत आहे. शोमध्ये, जिथे बिग बी आपल्या उत्कृष्ट होस्टिंग शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, तर काहीवेळा ते आपल्या शब्दांनी शोच्या स्पर्धकांना भावूक देखील करतात. दरवेळेस प्रमाणे याही सिझनला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. छोट्या पडद्यावरून अनेक रिअ‍ॅलिटी शो प्रसारित होत असतात. हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत आहेच शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला वाव देत आहेत. बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन सादर करत असलेल्या या शोची प्रचंड लोकप्रियता आहे.शोच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये अमिताभ काहीसे भावुक झालेले पाहायला मिळाले.

केबीसीच्या आगामी भागात राजस्थानमधील एका छोट्या गावातील शाळेच्या  शिक्षिका शोभा कुंवर केबीसीच्या मंचावर अमिताभच्या प्रश्नांना सामोरे जाताना दिसणार आहे. शोचा नवीन प्रोमो रिलीज आहे. नवीन प्रोमोमध्ये बिग बी यांनी  शोभा कुंवर यांना आयुष्यात अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले आहे. ते पाहून  बिग बींनी यांनी त्यांची तुलना देवाशी केली आहे. तर अमिताभचे शब्द ऐकून स्पर्धक भावूक झाल्या आहेत.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये, शोभा कुंवर अमिताभ बच्चन यांना शिक्षिका होण्यापूर्वी लग्नाच्या 16 वर्षांपर्यंत गृहिणी होत्या हे सांगते. तिने पुढे सांगितले की, तिला स्वतःची मुले नाहीत पण ती एक चांगली शिक्षिका बनून इतर मुलांना आनंदी करण्याचा विचार करते. यानंतर तिने पुढच्या क्लिपमध्ये खुलासा केला कि, 'मी एक विद्यार्थिनी आहे जिने KBC मधून सर्व काही शिकले आहे आणि आता मी एक शिक्षिका आहे. KBC मुळे आता माझी एक नाही तर 450 मुले शाळेत आहेत.''

हेही वाचा - Drishyam 2 : 2 ऑक्टोबरला रिलीज होणार 'दृश्यम 2' चा फर्स्ट लूक? अजय देवगणनेच दिली हिंट

शोभा कुंवर यांची गोष्ट ऐकल्यानंतर अमिताभ यांनी तिला प्रोत्साहन दिले आणि म्हणाले, 'देवासाठी दोन प्रकारची माणसे समान असतात - एक आई आणि एक शिक्षक… तुम्ही दोघेही आहात.'' अमिताभ यांनी केलेले  कौतुक ऐकून शोभा मात्र  खूप भावूक होतात.

दरम्यान, सोमवारी कौन बनेगा करोडपती १४ च्या  एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की, नवरात्री स्पेशल एपिसोड खूप खास असणार आहे. ‘नवरात्री दरम्यान देशातील ९ विविध राज्यांमधून ९ अतिशय खास महिलांना आमंत्रित करण्यात येईल. या महिला कौन बनेगा करोडपती १४ च्या मंचावर येतील आणि मनोरंजक खेळ खेळतील’ असे अमिताभ बच्चन  यांनी सांगितले. म्हणजेच नवरात्रीमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये फक्त महिलांनाच संधी देण्यात येणार आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Entertainment, KBC