मुंबई, 27 सप्टेंबर : अजय देवगण दमदार अभिनेता आहे. त्याच्या प्रत्येक भूमिका चाहत्यांना भावतात. पण त्याचा एक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. दरवर्षी २ ऑक्टोबर ला या चित्रपटाची आठवण चाहते काढतातच. हा चित्रपट म्हणजे ‘दृश्यम’. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता ‘दृश्यम 2’ सुद्धा बॉक्स ऑफिसवर थैमान घालण्यासाठी सज्ज झाला आहे. अजयनेच याबद्दल पोस्ट करत चाहत्यांना सांगितलं आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट टाकून चाहत्यांना ‘दृश्यम 2’ साठी जास्त वाट पाहावी लागणार नसल्याचे संकेत दिले आहेत. अजय देवगणने इंस्टाग्रामवर काही ‘जुनी बिले’ शेअर केली आहेत. या फोटोला त्याने ‘काही जुनी बिलं सापडली आहेत’ असं कॅप्शन दिल आहे. ही बिले 2014 सालचे आहे.आता ज्यांनी ‘दृश्यम’ चित्रपट पहिला असेल त्यांना हे बिलांचं प्रकरण चांगलंच लक्षात असेल. ही बिलं 2015 मध्ये आलेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा एक भाग होता. चित्रपटात अनेकवेळा एक डायलॉग होता की, ‘2 ऑक्टोबरला काय झाले?’ यानंतर अजय आणि त्याचे कुटुंबीय याबद्दल सांगतात आणि २ ऑक्टोबरची सगळी बिलं दाखवतात.
त्यामुळे आता २ ऑक्टोबर जवळ येताच अजयने टाकलेला हा बिलांचा फोटो पाहून चाहत्यांना खात्रीच पटली आहे कि ‘दृश्यम 2’ लवकरच येणार आहे. या तारखांसह अजयचे बिल पाहून चाहत्यांमध्ये चर्चा सुरु झालीये की ‘दृश्यम 2’ चा फर्स्ट लुक किंवा टीझर 2 ऑक्टोबरला रिलीज होऊ शकतो. हेही वाचा - Archana puran singh: अर्चना पूरन सिंहने व्यक्त केलं नेहमी हसऱ्या चेहऱ्यामागील दुःख; म्हणाल्या ‘माझी फसवणूक…’ अनेक चाहत्यांनी अशा आशयाच्या कमेंट अजयच्या या पोस्टवर केल्या आहेत. एका चाहत्याने अजय देवगणच्या पोस्टवर कमेंट केलीय कि , “दृश्यम 2 ऑन द वे.” तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “दृश्यम 2 लोड होत आहे.” एका यूजरने लिहिले, “दृश्यम 2 येतोय का?” चाहत्यांच्या कमेंट्सवरून तुम्ही अंदाज लावू शकता की प्रेक्षक या चित्रपटाची किती आतुरतेने वाट पाहत आहेत.
अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बू यांनी ‘दृश्यम 2’ च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, एका स्रोताने बॉलीवूड हंगामाला सांगितले की दृष्यम 2 चे निर्माता आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक 2 ऑक्टोबरपासून चित्रपटाचे प्रमोशन करण्याची योजना आखत आहेत.