मुंबई, 20 सप्टेंबर : टेलिव्हिजनचा सर्वात प्रसिद्ध शो कौन बनेगा करोडपतीचा 14 वा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दरवेळेस प्रमाणे याही सिझनला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. छोट्या पडद्यावरून अनेक रिअॅलिटी शो प्रसारित होत असतात. हा शो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन तर करत आहेच शिवाय त्यांच्या बुद्धीला, ज्ञानाला वाव देत आहेत. बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन सादर करत असलेल्या या शोची प्रचंड लोकप्रियता आहे. पण गेल्या एका एपिसोडमध्ये बिग बी एका महिला स्पर्धकावर नाराज दिसले आणि त्यांनी खेळ पुढे सुरु ठेवण्यास नकार दिला. आता त्याची सगळीकडे चर्चा होतेय. ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये यात बिजल हर्ष सुखानी या हॉट सीटवर विराजमान झाल्या होत्या. अमिताभ बच्चननी यांनी शोच्या सुरुवातीला बिजल यांना सगळे नियम समजावून दिल्यानंतर खेळ सुरु केला. दरम्यानं स्पर्धकाला त्यांच्याविषयी मध्येच अमिताभनी विचारलं तेव्हा बिजल म्हणाल्या,‘‘त्या व्यवसायाने मानसोपचार तज्ञ आहेत. तसंच लहान मुलांच्या क्लिनिकल हिप्नोथेरेपिस्ट आणि बिहेवियर थेरेपिस्ट देखील आहेत’’. बिजल यांच्यासोबत शो मध्ये सामिल व्हायला त्यांचे पती आणि आई देखील आले होते. हेही वाचा - Rana Daggubati : सेल्फी काढणाऱ्या चाहत्यावर भडकला राणा दग्गुबती; अभिनेत्याच्या त्या कृत्याची होतेय चर्चा बिजल यांच्याविषयी जाणून घेतल्यावर अमिताभनी खेळ सुरू केला. पण स्पर्धकाचे लक्ष संगणकाच्या स्क्रीनवर नव्हते,तर त्या इकडे-तिकडे पहात होत्या. त्या म्हणाल्या,‘‘मला भीती वाटत आहे’. आणि हे ऐकल्यावर बिग बी आपल्या सीटवरनं ताडकन उठले. आणि त्यांच्या पतीला त्यांनी बोलावून घेतले आणि आपल्या सीटवर बसायला सांगितले अन् स्वतः अमिताभ प्रेक्षकांमध्ये गेले. म्हणाले,‘‘मी अशा परिस्थितीत खेळ पुढे नेऊ शकत नाही’’.
बिजल पुन्हा अमिताभना म्हणतात की जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा भिती वाटते मला. आणि बस्स हे ऐकल्यावर बिग बी जोरात हसू लागले आणि उत्तरले की-‘‘जर मी प्रश्न नाही विचारणार तर मग आपण हा प्रश्नोत्तरांचा खेळ कसा खेळणार?’’ या प्रसंगामुळे मंचावर चांगलाच हशा पिकला. हास्यविनोद झाल्यानंतर बिजल लाइफलाइनच्या सहाय्याने 80 हजार रुपये जिंकल्या आहेत.