मुंबई, 20 सप्टेंबर : दाक्षिणात्य चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे राणा दग्गुबती. त्याने 'बाहुबली' चित्रपटात भल्लालदेव ही भूमिका साकारून जगभरात आपले चाहते निर्माण केले आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे लाखो चाहते वेडे होतात. चाहते अनेकदा त्यांच्या आवडत्या कलाकारासोबत फोटो काढण्यासाठी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी उत्सुक असतात. आपल्या आवडत्या कलाकाराला समोर पाहून चाहत्यांना कशाचेच भान राहत नाही. नुकतेच अभिनेता राणा दग्गुबती सोबत असेच काहीसे घडले. मात्र एका चाहत्याच्या कृतीचा राणा दग्गुबतीला राग आला. त्यानंतर या अभिनेत्याने जे केले त्याची सगळीकडे चर्चा होतेय. राणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
'बाहुबली' फेम अभिनेता राणा दग्गुबती नुकताच तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेला होता. यावेळी अभिनेत्यासोबत त्याची पत्नी मिहिका बजाज आणि वडील डी सुरेश बाबू हेदेखील होते. राणा दग्गुबतीला यावेळी चारही बाजूंनी छायाचित्रकारांनी घेरले होते. राणा दग्गुबती फोटोग्राफर्सना पुढे चालण्याऐवजी बाजूला चालायला सांगतात. अभिनेत्याच्या इच्छेला मान देत फोटोग्राफर बाजूला जातात. त्यानंतर अभिनेत्याने त्यांचे आभार मानले.
हेही वाचा - अभिनेता इम्रान हाशमीवर दगडफेक; जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग संपल्यानंतर बाहेर पडला अन्
पण अचानक कोठूनतरी एक चाहता राणाकडे धावत आला आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मग काय, राणा दग्गुबतीला त्याच्या या कृत्याचा राग आला आणि त्याने त्याचा फोन हिसकावून घेतला. मात्र, नंतर त्याने हसत या चाहत्याचा फोन परत देखील केला आणि त्याला मंदिर परिसरात सेल्फी न घेण्याची सूचना दिली.
In a recently released clip, Actor @RanaDaggubati, who recently visited the #Tirupati temple along with wife #MiheekaBajaj & his father #DSureshBabu, snatched a fan’s mobile phone away after he approached the actor for a selfie #ranadaggubati #WATCH pic.twitter.com/8lxIPGiqly
— HT City (@htcity) September 19, 2022
राणा सध्या त्याच्या 'कब्जा' या सिनेमामुळेही चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर हल्लीच रिलीज करण्यात आले. हा १९४२ ते १९८४ या काळातील भारतातील सर्वात मोठ्या गँगस्टर्सवर आधारित पिरियड ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाची कथा एका स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलाची कथा आहे जो नंतर अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश करतो.
राणा शेवटचे 'विराटपर्वम' या सिनेमात अभिनेत्री साई पल्लवीसोबत दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. आता तो लवकरच व्यंकटेशसोबत 'रे डोनावन' या प्रसिद्ध इंग्रजी मालिकेच्या हिंदी रुपांतरात दिसणार आहे. याशिवाय तो त्रिविक्रम श्रीनिवास दिग्दर्शित 'हिरण्यकश्यप' या चित्रपटात दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.