अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, चाहत्यांना भेटलेच नाहीत

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, चाहत्यांना भेटलेच नाहीत

ते प्रत्येक रविवारी संध्याकाळी ‘जलसा’ बंगल्याच्या बाहेर येऊन चाहत्यांना भेटतात. चाहत्यांना भेटण्याच्या प्रथेला त्यांनी ‘संडे दर्शन’ असं नाव ठेवलं आहे.

  • Share this:

मुंबई, 6 मे- बॉलिवूडचे कट्टर चाहते मुंबई दर्शनाला आल्यावर शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचं घर पाहायला गेला नाही असं तर होऊ शकत नाही. बॉलिवूडचे शहेनशहा आणि बादशहाचे जगभरात चाहते आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी कित्येक मैलांचा प्रवास करून लोक मुंबईत येतात. स्टार्सही त्यांच्या चाहत्यांचा हिरमोड होऊ नये म्हणून त्यांच्या घरातून एक झलक दाखवतात. अमिताभ बच्चन यांच्यासाठी हा एक नियम आहे.

ते प्रत्येक रविवारी संध्याकाळी ‘जलसा’ बंगल्याच्या बाहेर येऊन चाहत्यांना भेटतात. चाहत्यांना भेटण्याच्या प्रथेला त्यांनी ‘संडे दर्शन’ असं नाव ठेवलं आहे. गेल्या ३६ वर्षांपासून ही प्रथा अविरत सुरू आहे. मात्र ५ मे हा दिवस अपवादात्मक ठरला. याचं कारण होतं अमिताभ यांची तब्येत. टाइम्स नाउने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बिग बी यांची तब्येत ठीक नव्हती. अमिताभ यांनी स्वतः सोशल मीडियावर याची माहिती देत म्हटलं की यावेळी संडे दर्शन होणार नाही.

...म्हणून प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न मोडलं
 

View this post on Instagram
 

Sunday as ever .. ❤️❤️


A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

अमिताभ यांनी त्यांच्या 3154 व्या ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘संध्याकाळी जलसाच्या गेटवर आज संडे मीटिंग करत नाहीये.’ अमिताभ बच्चन गेल्या ३६ वर्षांपासून अशाप्रकारची मीटिंग घेत आहेत. जलसा बंगल्याच्या बाहेर मोठ्या संख्येने त्यांचे चाहते जमा होतात आणि बिग बी घराच्या बाहेर येऊन सर्वांना अभिवादन करतात.

नेटफ्लिक्सचा हा शो पाहून 12 वर्षाच्या मुलीने केली आत्महत्या

बिग बी अनेकदा या मीटिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. बॉलिवूडच्या या शहेनशहाच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ते ब्रह्मास्त्र सिनेमात दिसणार आहेत. याशिवाय त्यांच्याकडे झुंड हा सिनेमाही आहे. तसेच छोट्या पडद्यावर ते कौन बनेगा करोडपतीमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांना दिसणार आहेत.

Sacred Games 2 Teaser: सरताज सिंगचा काटेकर परत येणार का?

VIDEO: उर्मिलानंतर राजकारणात एण्ट्री करणार? प्रिया बापट म्हणते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 04:35 PM IST

ताज्या बातम्या