नेटफ्लिक्सचा हा शो पाहून 12 वर्षाच्या मुलीने केली आत्महत्या

नेटफ्लिक्सचा हा शो पाहून 12 वर्षाच्या मुलीने केली आत्महत्या

12 वर्षीय मुलीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. यात तिने आपल्या आत्महत्येची सहा कारणं लिहिली.

  • Share this:

अमेरिकेतील नेटफ्लिक्सचा सर्वात विवादीत शो ‘13 Reasons Why’ च्या विरोधात अजून एक तक्रार नोंदवण्यात आली आहे. 12 वर्षीय जेसिका स्कैटरसनने तिच्या राहत्या घरी बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचं कारण ही वेबसीरिज मानली जात आहे.

12 वर्षीय मुलीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. यात तिने आपल्या आत्महत्येची सहा कारणं लिहिली. ‘13 Reasons Why’ या टीव्ही शोमध्ये ज्या पद्धतीने तरुणाईचं नैराश्य आणि त्यांच्या आत्महत्येच्या कथा मांडण्यात आल्या आहेत, त्याच पद्धतीने जेसिकाने स्वतःचं आयुष्य संपवलं आहे.

Sacred Games 2 Teaser: सरताज सिंगचा काटेकर परत येणार का?

जेसिकाच्या आईच्या मते, त्यांची मुलगी हा शो पाहायची. जेव्हापासून तिने हा शो पाहायला सुरुवात केली तिची वागणूक बदलायला लागली. 12 वर्षांच्या जेसिकाच्या खोलीत फास लावून लटकणाऱ्या एका मुलीचं चित्रंही मिळालं आहे. त्याचसोबत जेसिकाच्या हातावर पेन्सिल बेल्डने कापल्याचे काही निशाणही होते.

OMG! 'द मेट गाला'साठी दीपिकानं खरेदी केली चक्क एवढ्या लाखांची बॅग

पोलिसांच्या मते, जेसिकाने आपल्या शाळेतील मित्र- मैत्रीणींमुळे तणावात होते. त्यातच हा शो पाहिल्यानंतर मृत्यू हाच एकमेव पर्याय असल्याचं तिने ठरवलं. नेटफ्लिक्सचा हा शो याआधीही वादात अडकला होता. या शोमध्ये एका मुलीवर बलात्कार झाल्याचा सीन दाखवण्यात आला होता. याच सीनचा अनेक संघटनांनी कडाडून विरोध केला होता. नेटफ्लिक्सकडून या शोला 18 रेटिंग देण्यात आली आहे. पण अजूनही हा शो काढून टाकण्यावर कोणताही विचार करण्यात आलेला नाही.

एकमेकांवर वस्तू फेकून मारायचे अर्जुन आणि मेहर, त्या भांडणानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

आतापर्यंत अमेरिकेत हा शो पाहणाऱ्यांपैकी सहाजणांनी आत्महत्या केली असून लवकरात लवकर हा शो बंद करण्याची मागणी केली जात आहे. भारतात या शोचे दोन सीझन उपलब्ध असून तिसरा सीझन लवकरच भारतात रिलीज केला जाणार आहे.

VIDEO: उर्मिलानंतर राजकारणात एण्ट्री करणार? प्रिया बापट म्हणते...

First published: May 6, 2019, 2:11 PM IST
Tags: netflix

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading