जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठी अभिनेत्रीचा Ice Yoga; VIDEO पाहून ऐन गरमीत गार व्हाल

मराठी अभिनेत्रीचा Ice Yoga; VIDEO पाहून ऐन गरमीत गार व्हाल

मराठी अभिनेत्रीचा Ice Yoga; VIDEO पाहून ऐन गरमीत गार व्हाल

मराठी अभिनेत्रीच्या बर्फातील (Yoga in Ice) या योगाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 एप्रिल : सध्याच्या काळात योग (Yoga), व्यायाम या गोष्टींचं महत्त्व प्रत्येकाला जाणवत आहे. या योगातही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अनेकांचा असतो. असाच एक प्रयत्न मराठी अभिनेत्रीनेही केला आहे. या अभिनेत्रीने चक्क बर्फात योगा केला आहे. तिच्या योगाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून ऐन गरमीत तुम्ही गार पडाल. बर्फात योगा करणारी ही अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे (Sonali Khare) आहे. सोनालीने तिचा बर्फात योग (Sonali khare yoga in ice) करत एक व्हिडीओ (Sonali khare yoga video) पोस्ट केला आहे. यात तिने शीर्षासन केलं आहे. सोनाली ही मनालीला फिरण्यासाठी गेली असता तिने हा व्हिडीओ शूट केला आहे.

जाहिरात

अभिनयाव्यतिरिक्त सोनाली योगासाठी तिचा जास्तीत जास्त वेळ खर्च करते आणि त्यामुळेच ती अतिशय फिट आहे. सोनालीला एक 13 वर्षीय मुलगी देखील आहे. हे वाचा -  याशिवाय सोनालीचे अनेक योग व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. सोनाली आणि तिचा पती बिजय आनंद दोघंही योग करतात. बिजय हा योग प्रशिक्षही आहे. तो अनेकांना योगाचे धडे देतो.

सोनाली कलर्स मराठीवरील (colors Marathi) ‘आज काय स्पेशल’ या कार्यक्रमात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत काही दिवसांपूर्वी दिसली होती. तर आता ती एका वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अॅमेझॉन प्राइमच्या ‘वेल डन’ (well done) या मराठी वेबसीरिजमध्ये ती दिसणार आहे.

हे वाचा -  सनी लिओनी राहणार मुंबईत; खरेदी केलं 16 कोटींचं आलिशान घर

सोनालीने अनेक मालिका तसंच चित्रपटांतही काम केलं आहे. आभाळमाया, ऊन पाऊस, बे दूने दहा या मालिका तर चेकमेट (checkmate), सावरखेड- एक गाव (savarkhed – ek gaav) , तेरे लिये अशा चित्रपटांत तिनं काम केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात