Amitabh-Jaya Anniversary: रेखा-अमिताभ यांचे लव्ह सीन पाहिल्यावर काय झाली होती जया यांची अवस्था

Amitabh-Jaya Anniversary: रेखा-अमिताभ यांचे लव्ह सीन पाहिल्यावर काय झाली होती जया यांची अवस्था

रेखा आणि अमिताभ यांची ओळख झाली त्यावेळी अमिताभ यांचं जयाशी लग्न झालं होतं. पण रेखा अमिताभ यांच्यात ऐवढ्या गुंतत गेल्या की, त्यांचं जीवनच त्यामुळे बदलत गेलं.

  • Share this:

मुंबई, 3 जून : बॉलिवूडचं सर्वात आयडियल कपल म्हणून ओळखले जाणारे अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा आज 47 वा वाढदिवस. बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये राहूनही अमिताभ आणि जया यांच्या नात्यात कधीच दुरावा आला नाही. त्यामुळेच या जोडीकडे आज एवढ्या वर्षांनंतरही सन्मानानं पाहिलं जातं. अर्थात वैवाहिक आयुष्यात असा एक काळ आला होता जिथे या दोघांच्या नात्याची वीण थोडी सैल झाली होती. जेव्हा अमिताभ यांच्या जीवनात रेखा यांची एंट्री झाली होती. त्यावेळी नेमकं काय घडलं पाहूयात...

अमिताभ आणि रेखा यांच्यात असं काही नातं होतं ज्याच्या खोलीचं अंदाज फक्त रेखा यांच्या काही वक्तव्यांवरून लावता येतो. 2004 'रेन्डिवू विद सिमी ग्रेवाल' या शोमध्ये बोलताना रेखा म्हणाल्या, मी हे त्यांचं नातं किंवा संसार तोडण्यासाठी केलं नाही. एक व्यक्ती म्हणून मी एकच सांगेन की त्यांच्या असण्यानं मला आनंद होतो. मी त्यांच्या चांगुलपणानं सर्वाधित प्रभावित झाले होते. माझ्यासाठी मिस्टर बच्चन यांच्यासमोर उभं राहणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. मी माझ्या लाइफमध्ये त्यांच्यासारखं काही पाहिलंच नाही. त्यांच्यामुळे मी स्वतःवर विश्वास करायला शिकले.

बर्थडेआधी आर्चीनं शेअर केला HOT फोटो, तिचा नवा लुक पाहिलात का?

रेखा आणि अमिताभ यांची ओळख झाली त्यावेळी अमिताभ यांचं जयाशी लग्न झालं होतं. पण रेखा अमिताभ यांच्यात ऐवढ्या गुंतत गेल्या की, त्यांचं जीवनच त्यामुळे बदलत गेलं. 1980 मध्ये 'सुपर' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जया यांच्याबद्दल बोलताना रेखा म्हणाल्या, मी एकेकाळी जया यांनी खूप चांगली व्यक्ती समजत होते. एवढंच नाही तर मी त्यांना माझी बहीण मानत होते. त्या नेहमीच मला चांगला सल्ला द्यायच्या मात्र नंतर मला समजलं की त्यांनी हे केवळ माझ्यावर स्वतःचा प्रभाव पाडण्यासाठी करत आहेत. एकाच बिल्डिंगमध्ये राहून सुद्धा त्यांनी मला त्यांच्या लग्नात बोलवलं नाही.

बिग बॉसची ही स्पर्धक आहे चौथ्या लग्नाच्या तयारीत; म्हणाली, फक्त आणखी एकदा...

यावरून असं दिसतं या दोघीही सुरुवातीपासून एकमेकींना फारस पसंत करत नव्हत्या. पण जेव्हा या दोघींमध्ये अमिताभ आले त्यावेळी काय झालं हे रेखा यांच्या एका मुलाखतीत समजलं. त्या म्हणाल्या, ही गोष्ट 'मुकद्दर का सिंकदर' सिनेमाच्या स्क्रिनिंगच्या वेळची आहे. मी प्रोजेक्शन रुममध्ये होते. जया आणि त्यांची मुलं पहिल्या रांगेत, तर अमिताभ आणि आणखी काही लोक दुसऱ्या रांगेत बसले होते. जेव्हा सिनेमात माझे आणि अमिताभ यांचे प्रेम प्रसंग दाखवले जात होते त्यावेळी जया यांना रडू कोसळलं होतं. या सिनेमानंतर अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मला सांगितलं, जया बच्चन यांनी मला अशा कोणत्याही सिनेमा न घेण्याविषयी त्यांना सुचवलं होतं ज्यात अमिताभ हिरो असतील.

ट्विंकलनं दुसऱ्या बाळासाठी अक्षयसमोर ठेवली होती विचित्र अट, असा झाला खुलासा

 

First published: June 3, 2020, 9:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading