मुंबई, 2 जून : बॉलिवूडच्या आयडियल कपल पैकी एक म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना. एकीकडे अक्षय हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे तर दुसरीकडे ट्विंकल ही एक उत्तम लेखिका आण प्रोड्युसर आहे. याशिवाय तिच्या उत्तम सेन्स ऑफ ह्युमर आहे हे तर सर्वांनाच माहित आहे. या दोघांनी दोन गोड मुलं सुद्धा आहे आरव आणि नितारा पण आरवच्या जन्मानंतर दुसऱ्या बाळासाठी ट्विंकलनं अक्षय कुमारसमोर एक विचित्र अट ठेवली होती ज्यामुळे तो हैराण झाला होता. एका मुलाखतीत ट्विंकलनं याचा खुलासा स्वतःच केला.
अक्षय आणि ट्विंकलचा हा किस्सा खरं तर खूप जुना आहे. जेव्हा अक्षय आणि ट्विंकल खन्नानं करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनी धम्माल तर केलीच मात्र यासोबतच ट्विंकलनं या एपिसोडमध्ये दुसऱ्या बाळासाठी अक्षय कुमार समोर जी अट ठेवली होती त्याचा खुलासा केला.
याबद्दल बोलताना ट्विंकल म्हणाली, आरवच्या जन्मानंतर मी अक्षयला सांगितलं होतं जोपर्यंत ते एखादा सेंसिबल आणि चांगला सिनेमा करत नाही तो पर्यंत मी दुसऱ्या बाळाचा विचार करणार नाही. जेव्हा हा खुलासा ट्विंकलनं करणच्या शोमध्ये केला त्यावेळी तो सुद्धा हैराण झाला. त्यावर अक्षय म्हणाला, तुला समजलंच असेल की, अशावेळी माझ्यावर काय वेळ आली असेल. आता अक्षय आणि ट्विंकलला दोन मुलं आहेत. मुलाचं नाव आरव तर मुलीचं नाव नितारा आहे.