मुंबई, 2 जून : मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूला ओळखत नाही असं कोणीच सापडणार नाही. रिंकूचा 3 जूनला 19 वा वाढदिवस. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे अकलूजच्या घरी असेलेल्या रिंकूनं तिच्या वाढदिवसाआधी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे जो पाहिल्यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रिंकू सध्या लॉकडाऊनमुळे तिच्या कुटुंबासोबत अकलूजला राहतेय मात्र अशातही तिनं स्वतःला व्यवस्थित मेंटेन केलं आहे. नुकताच तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच वेगळी आणि ग्लॅमरस दिसत आहे. सैराटमध्ये आर्ची साकारल्यानंतर रिंकूनं पुढेच्या सिनेमांसाठी बरंच वजन कमी केलं होतं मात्र या फोटोमध्ये ती अगदी परफेक्ट आणि मेंटेन लुकमध्ये दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत रिंकू तिच्या फिटनेसबद्दल बोलली होती. यावेळी लॉकडाऊनमध्ये स्वतःला फिट कसं ठेवते याविषयी सुद्धा तिनं सांगितलं होतं. रिंकू म्हणाली, लॉकडाऊनमध्ये मी काम करत नसले तरीही फिटनेस हा आता आयुष्याचा एक भाग झाला आहे. त्यामुळे मेंटेन राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि मी लॉकडाऊनमध्ये घरच्या घरी न चुकता वर्कआऊट करते. यातून दोन गोष्टी होतात. एक म्हणजे तुम्हाला यामुळे दिवसभर फ्रेश वाटतं आणि व्यायाम तुमच्या आयुष्याचा भाग बनून गेला की आळस दूर राहतो.
रिंकूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर लॉकडाऊनपूर्वी तिन हंड्रेड डेस या वेब सीरिजमध्ये एका मराठमोळ्या मुलीची भूमिका साकारली होती. जिच्या आयुष्यात फक्त 100 दिवस असतात आणि ते ती भरभरून जगते. तिची ही वेबसीरिज खूप गाजली आणि तिच्या भूमिकेच कौतुक सुद्धा झालं. अभिनेत्री लारा दत्ता यात मुख्य भूमिकेत होती. याशिवाय आगमी काळात रिंकू अमिताभ बच्चन यांच्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या सिनेमात दिसणार आहे.