मुंबई, 2 जून: बिग बॉस सीझन 4 ची स्पर्धक आणि प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्री पामेला अँडरसन पुन्हा एकदा लग्न करण्याच्या तयारीत आहे. न्यूयॉर्क टाइम्स या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत पामेलानं तिच्या मागच्या तीन लग्नांबद्दल बातचीत केली. यासोबतच तिनं पुन्हा एकदा लग्नाच्या तयारीत असल्याचाही खुलासा केला. जेव्हा या मुलाखतीत तिला विचारण्यात आलं की, तु पुन्हा एकदा लग्नाचा विचार करत आहेस का? त्यावर पामेलानं उत्तर दिलं. हो, अर्थातच. आता फक्त आणखी एकदा देवा.
आपल्या मागच्या रिलेशनशिपबद्दल बोलताना पामेला म्हणाली, देवाची कृपा आहे की, हे सर्व जे व्हायचं होतं ते झालं. आज मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मी खूप खूश आहे. माझं तीन वेळा लग्न झालं आहे. पण लोकांना वाटतं की माझं पाच वेळा लग्न झालं. पहिलं लग्न टॉम ली, दुसरं बॉब रिची आणि तिसरं लग्न रिक सोलोमनशी झालं होतं. बसं तीन लग्न आहेत आणि मला माहित आहे की, हे खूप आहे मात्र पाच पेक्षा कमी आहे. आपल्या चौथ्या लग्नाविषयी बोलताना पामेला म्हणाली, हो आणखी एकदा फक्त एकदा देवा फक्त एकदा.
या मुलाखातीत 52 वर्षीय पामेला जॉन पीटर्ससोबतच्या आपल्या रिलेशनशिपबद्दलही बोलली. ती म्हणाली, माझं लग्न झालं नाही, ना मी खूप रोमँटिक नाही. मला वाटतं लोकांसाठी मी एक सोप लक्ष्य होते. मला वाटतं लोकं भीत भीत जगतात. हा एक छोटासा क्षण आहे जो येतो आणि निघून जातो. पण यात कोणतही लग्न होत नाही. असं वाटतं काही घडलंच नाही. हॉलिवूड सिनेमांसोबतच पामेलानं बिग बॉस 4 मधून भारतात स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण केला होता.