मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aamir Khan: महानायक अमिताभ बच्चन यांनी उडवली मिस्टर परफेक्शनिस्टची खिल्ली, पाहा मजेदार VIDEO

Aamir Khan: महानायक अमिताभ बच्चन यांनी उडवली मिस्टर परफेक्शनिस्टची खिल्ली, पाहा मजेदार VIDEO

केबीसी च्या 14 व्या सिजनमध्ये येत्या काळात फारच अप्रतिम पाहुणे भेटीला येणार आहेत. यामध्ये आमिर खान आणि अमिताभ यांची हलकी नोक-झोक सुद्धा दिसून येणार आहे.

केबीसी च्या 14 व्या सिजनमध्ये येत्या काळात फारच अप्रतिम पाहुणे भेटीला येणार आहेत. यामध्ये आमिर खान आणि अमिताभ यांची हलकी नोक-झोक सुद्धा दिसून येणार आहे.

केबीसी च्या 14 व्या सिजनमध्ये येत्या काळात फारच अप्रतिम पाहुणे भेटीला येणार आहेत. यामध्ये आमिर खान आणि अमिताभ यांची हलकी नोक-झोक सुद्धा दिसून येणार आहे.

  मुंबई 01 ऑगस्ट: भारतमधला एक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून केबीसी म्हणजे कौन बनेगा करोडपतीकडे पाहिलं जातं. आपल्या अनोख्या शैलीने महानायक अमिताभ बच्चन गेली अनेकवर्ष या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमात येत्या काळात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हजेरी लावणार आहे. आणि कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन चक्क आमिरची खिल्ली उडवताना दिसत आहेत. सोनी एन्टरटेनमेन्टच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन हे आमिरची चांगलीच हजेरी (amitabh bachchan and aamir khan on kbc 14) घेताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये आमिर आपल्या मिश्किल अंदाजात असं सांगतो, “मी ट्विटरवर आलो यासाठी अमितजी यांचे आभार. पण माझ्याकडून काही ट्विट होत नाही काय माहित. माझे मित्र जेव्हा सिनेमे बनवतात तेवढ्याच मी ट्विटरवर प्रमोट करतो.” असं म्हणून आमिर हसू लागतो. यावर एकदम कडक उत्तर देत अमिताभ त्याला सांगतात, “एवढ्या सिनेमाचं प्रमोशन करतोस तर केबीसीचं प्रमोशन करायला काय होतं तुला.” यावर सगळीकडेच एक हशा पिकतो आणि त्यावर उत्तर देत आमिर म्हणतो, “केबीसी असा कार्यक्रम आहे ज्याला प्रमोशनची गरज नाही.” हे ही वाचा- नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विकी कौशल दिसणार एकत्र, व्हायरल PHOTO आले समोर आमिरच्या या हजरजबाबीपणाचं कौतुक करत स्वतः अमिताभ बच्चन सुद्धा टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करताना दिसून आले आहेत. सध्या या व्हिडिओची आणि कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर येणाऱ्या या नव्या पाहुण्यांची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे.
  भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आमिरसह काही खास पाहुणे या मंचावर दाखल होताना दिसणार आहे. भारतासाठी फारच खास असलेलं हे वर्ष आणि भारतासाठी असलेला हा गर्वाचा आणि अभिमानचा हा क्षण साजरा करायला केबीसीच्या मंचावर कारगिल युद्धात लक्षणीय कामगिरी गाजवलेले मेजर डी. पी सिंग, कर्नल मिताली मधुमिता, भारताचा प्रसिद्ध फुटबॉलपटू सुनील छेत्री अशी मंडळी हजेरी लावणार आहेत.
  सोनी वाहिनीच्या एका प्रोमोमध्ये कर्नल मिताली या प्रेक्षकांना हाऊ इज द जोश असं विचारताना सुद्धा दिसत आहेत. तर कारगिल युद्धाचे काही प्रसंग सुद्धा मेजर सिंग शेअर करताना दिसणार आहेत. देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे समजले जाणारे भारतीय जावं तसंच खेळाडू आणि कलाकार असा एक अनोखा संगम या कार्यक्रमात बघायला मिळणार आहे.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Aamir khan, Amitabh Bachchan, KBC, Sony tv

  पुढील बातम्या