जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विकी कौशल दिसणार एकत्र, व्हायरल PHOTO आले समोर

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विकी कौशल दिसणार एकत्र, व्हायरल PHOTO आले समोर

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विकी कौशल दिसणार एकत्र, व्हायरल PHOTO आले समोर

रश्मिका मंदाना आणि विकी कौशल लवकरच सोबत स्क्रीव शेअर करणार आहे. त्यामुळे दोघांचेही चाहते त्यांना सोबत पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 ऑगस्ट : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लवकरच बॉलिवूड पदार्पण करत आहे. अशातच तिचे अनेक आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ती सतत कोणत्या न कोणत्या कारणावरुव चर्चेत असते. नुकतीच रश्मिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिनं बॉलिवूड अभिनेता विकी कौशललाही टॅग केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. स्टोरीला ठेवलेले फोटो सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.ल रश्मिका मंदानानं तिच्या इन्टाग्राम अकाउंटला एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये दिसतंय की, रश्मिकानं बॉलवर डोळे, नाक आणि तोंड असलेला चेहरा काढला आहे. यामध्ये तिनं विकी कौशलला टॅग करत लिहिलं की, ‘हा लुक माझ्याकडून तुझ्यासाठी’. विकीनंही त्याच्या इन्स्टाग्रामला स्टोरी ठेवत म्हटलं की, ‘तुझ्यासोबत काम करुन चांगलं वाटंल’. दोघांची स्टोरी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हेही वाचा - हृताचा Timepass 3 वादात; सिनेमातील ती दृश्य तातडीने काढून टाकण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

News18

रश्मिका आणि विकी लवकरच सोबत स्क्रीव शेअर करणार आहे. त्यामुळे दोघांचेही चाहते त्यांना सोबत पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे. दोघंही कोणत्या प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र या दोघांची फ्रेश जोडी स्क्रीनवर काय धमाल करण्यार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

News18

रश्मिका लवकरच रणबीर कपूरसोबत ‘अ‍ॅनिमल’मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती अमिताभ बच्चन स्टारर ‘अलविदा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याचबरोबर अभिनेता विकी कौशलसोबत ‘गोविंदा नाम मेरा’ आणि ‘साम बहादूर’मध्ये दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात