जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नाच्या 27 वर्षांनंतरही पतीपासून वेगळं राहते 'ही' प्रसिद्ध गायिका; कारण वाचून वाटेल आश्चर्य

लग्नाच्या 27 वर्षांनंतरही पतीपासून वेगळं राहते 'ही' प्रसिद्ध गायिका; कारण वाचून वाटेल आश्चर्य

अलका याज्ञिक यांना आज अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

अलका याज्ञिक यांना आज अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी गायनाला सुरुवात करणाऱ्या अलका याज्ञिक यांनी 90 च्या दशकात आपल्या सुरेल आवाजाने सर्वांची मने जिंकली होती. बर्‍याच दिवसांपासून मुंबईत वास्तव्यास असलेली अलका याज्ञिक आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहेत. परंतु आपल्या करिअरसाठी अलका याना आयुष्यात मोठा त्याग करावा लागला. काय आहे त्यांच्या आयुष्याची गोष्ट जाणून घ्या.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 मे: अलका याज्ञिक ही बॉलिवूडमधील सुपरहिट गायिकांपैकी एक आहे. लता मंगेशकर यांच्यानंतर सर्वाधिक गाजलेल्या गायिकांमध्ये त्यांचं नाव नक्कीच घेता येईल. अलका याज्ञिक यांना आज अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी गायनाला सुरुवात करणाऱ्या अलका याज्ञिक यांनी 90 च्या दशकात आपल्या सुरेल आवाजाने सर्वांची मने जिंकली होती. त्यांची सुरेल गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. बर्‍याच दिवसांपासून मुंबईत वास्तव्यास असलेली अलका याज्ञिक आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहेत. परंतु आपल्या करिअरसाठी अलका याना आयुष्यात मोठा त्याग करावा लागला. काय आहे त्यांच्या आयुष्याची गोष्ट जाणून घ्या. अलकाने आपले आयुष्य गायनाला समर्पित केले आहे. अलका याज्ञिक यांना संगीतामुळे पतीसोबत राहण्याची संधी मिळाली नाही. संगीतामुळेच अलका मुंबईत आली आणि जवळपास 27 वर्षांपासून अलका तिच्या पतीपासून दूर मुंबईत राहते. अलका याज्ञिक यांनी  नीरज कपूरसोबत लग्नगाठ बांधली आहे. पण त्या पतीपासून मात्र दूर राहतात.

News18लोकमत
News18लोकमत

अलका याज्ञिक 1986 मध्ये पती नीरज कपूरला भेटल्या. अलका आपल्या आईसोबत कोलकाता येथील घरातून दिल्लीला आली होती. अलकाच्या आईच्या मैत्रिणीचा भाचा म्हणजेच नीरज कपूर त्यांना स्टेशनवर घ्यायला आला होता. दोघेही इथे पहिल्यांदाच भेटले होते. नीरज कपूरने मुंबईत अलकाशी मैत्री केली आणि दोघेही बोलू लागले. काही महिने बोलल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. एकीकडे अलकाचं नीरजसोबतच नातं फुलत होतं तर दुसरीकडे त्या करिअरमध्येही यश मिळवत होत्या. जवळपास दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अलकाचे पहिले बॉलिवूड गाणे हिट झाले. ‘एक दो तीन’ असे या गाण्याचे बोल होते. या गाण्याच्या यशाने अलकाच्या आयुष्यात रंग भरले. त्याच वर्षी दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही आपल्या पालकांना याची माहिती दिली आणि दोघांनी संपूर्ण आयुष्य एकत्र घालवायचं ठरवलं. Anuradha Paudwal: अरिजित सिंगचं गाणं ऐकून रडू लागल्या अनुराधा पौडवाल; त्या वक्तव्यावर दिलं असं स्पष्टीकरण अलका याज्ञिकने १९८९ मध्ये शिलाँगचे उद्योगपती नीरज कपूरसोबत लग्न केले. दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोन वर्षांपूर्वीच दोघांची भेट झाली होती. अलका आणि नीरजचे कुटुंब मित्र होते. यादरम्यान दोघांची भेट झाली. जवळपास २ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले. यानंतर दोघांनी 1989 मध्ये लग्न केले. मात्र, लग्न झाल्यापासून दोघेही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. लग्नाच्या सुरुवातीला नीरजने मुंबईत व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्नही केला होता. पण नीरजचा मुंबईत व्यवसाय चालत नसल्याने त्याने शिलाँगला परतण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोघेही जवळपास २७ वर्षे एकमेकांपासून वेगळे राहतात. पण दोघांमध्ये खूप प्रेम आहे. दोघांना सायशा कपूर ही मुलगी आहे. जी तिच्या आईसोबत मुंबईत राहते.

News18लोकमत
News18लोकमत

अलका याज्ञिक आणि नीरज कपूर दीर्घकाळापासून एकमेकांपासून लांब राहत आहेत. याबाबत दोघांमध्ये चांगली समजूत आहे. दोघांनाही एक मुलगी आहे. नीरज आणि अलका एकत्र सुट्टी घालवतात. याशिवाय नीरज शिलाँगमध्ये आपला व्यवसाय सांभाळतो. तर अलका करिअरमुळे मुंबईत राहते. दोघांच्या वैवाहिक जीवनातही तणावाचे वळण आले. या कारणावरून दोघांमध्ये 3-4 वर्षांपासून तेढ निर्माण झाली होती. जोरदार वादानंतर दोघांनीही लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लवकरच दोघांना एकमेकांच्या प्रेमावर विश्वास होता आणि त्यांनी लग्न अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही एकत्र आनंदी जीवन जगत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात