मुंबई, 15 एप्रिल : बॉलिवूडमधील सर्वात क्यूट अभिनेत्रींपैकी एक आलिया भट्ट हिने काल अभिनेता रणबीर कपूर (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर देश-विदेशातून त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आलिया भट्टचा बॉडीगार्डनेही आलियाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने फोटोदेखील शेअर केले आहेत. यादरम्यान रणबीर कपूर दिसून येत आहे. आलिया भट्टचा बॉडीगार्ड सुनील टाळेकर बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाशी जोडला गेला आहे. आलिया लहान असल्यापासून तो त्यांच्यासाठी काम करीत आहे. आता आलियाच्या लग्नानंतर सुनीलने भावुक होत शुभेच्छा दिल्या आहेत. हे ही वाचा-
लग्नानंतर आलिया भट्ट-रणबीर कपूर बनले इतक्या कोटींचे मालक, वाचा किती आहे कमाई
फोटोंवर आलियाने दिली प्रतिक्रिया.. सुनील टाळेकर याने इन्स्टाग्रामवर नव विवाहित दाम्पत्य आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसोबत फोटो शेअर केले आहेत. हे फोटो लग्नादरम्यानचे आहेत. या फोटो तिघेही खूप आनंदात दिसत आहेत. फोटो शेअर करीत सुनीलने लिहिलं की…तुझे चिमुकले हात पकडण्यापासून ते तुला नववधूच्या रुपात पाहण्यापर्यंत..मला हे सांगावस वाटतं की, मला खूप आनंद झालाय. हे फोटोज आलियाने स्वत: लाइकही केले आहे.
याशिवाय सुनीलने आणखी एक फोटो शेअर केला आहे. ज्यात रणबीर कपूरने आलियाला उचलून घेतलं आहे. मराठमोठा सुनील टाळेकर सोशल मीडियावर सक्रीय असतो.
याशिवाय तो आलियाच्या आगामी चित्रपटांनाही प्रमोट करतो. त्याने एक थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. ज्यात आलिया लहान असल्याचं दिसत आहे. सोबतच आलियासोबत तिची आई सोनी राजदानदेखील दिसत आहे. सुनील दोघांसोबत फोटोत दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.