जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / लग्नानंतर आलिया भट्ट-रणबीर कपूर बनले इतक्या कोटींचे मालक, वाचा किती आहे पती-पत्नीची कमाई

लग्नानंतर आलिया भट्ट-रणबीर कपूर बनले इतक्या कोटींचे मालक, वाचा किती आहे पती-पत्नीची कमाई

लग्नानंतर आलिया भट्ट-रणबीर कपूर बनले इतक्या कोटींचे मालक, वाचा किती आहे पती-पत्नीची कमाई

बहुप्रतीक्षित आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची जोरदार चर्चा होती. काल, 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 एप्रिल-  बहुप्रतीक्षित आलिया भट्ट  (Alia Bhatt)  आणि रणबीर कपूरच्या   (Ranbir Kapoor)   लग्नाची जोरदार चर्चा होती. काल, 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला. या लग्नाला काही बॉलिवूड सेलेब्सनी हजेरी लावली होती. आलिया आणि रणबीरची एक झलक पाहण्यासठी लोक उत्सुक होते. त्यांनतर या दोघांच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.दरम्यान कोट्याविधी कमावणारे आलिया आणि रणबीर, या दोघांच्या लग्नानंतर दोघांची मिळून एकूण संपत्ती किती झाली हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे. याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. रणबीर कपूर हा आपल्या पहिल्या चित्रपटापासूनच चर्चेत आला होता. पहिला चित्रपट तितकासा चालला नसला, तरी त्याला प्रचंड प्रसिद्ध मिल्लई होती. रणबीरने सोनम कपूरसोबत ‘साँवरिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. बॉलिवूडला चॉकलेट हिरो मिळाल्याचं म्हटलं जात होतं. रणबीरच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, तो एका चित्रपटासाठी 18 ते 20 कोटी रुपये घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याची एकूण संपत्ती 322 कोटी रुपये आहे. रणबीरची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. त्याने ये जवानी है दिवानी,रॉकस्टार, राजनीती, बर्फी आणि वेक अप सिड सारख्या चित्रपटात काम केले आहे.

News18

रणबीर टीव्ही जाहिरातींमधून करोडोंची कमाई करतो. त्याने काही कंपन्यांमध्येही आपले पैसे गुंतवले आहेत. ज्यामुळे त्याला नियमित उत्पन्नही मिळते. त्याच्याकडे अनेक आलिशान कार आहेत. मर्सिडीजपासून ऑडीपर्यंत, अभिनेत्याच्या कार कलेक्शनमध्ये अशा अनेक आलिशान कार्स आहेत. त्याच्याकडे असलेली सर्वात महागडी कार मर्सिडीज बेंझ एएमजी जी-63 आहे, ज्याची किंमत 3 कोटी रुपये आहे.

News18

आलिया भट्टबाबत बोलायचं झालं तर ती आजची सर्वात महागडी अभिनेत्री आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीची एकूण संपत्ती 150 कोटींपेक्षा थोडी जास्त आहे. आलिया तिच्या निरागस सौंदर्याने आणि अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेते. यामुळेच ती एका चित्रपटासाठी 5 ते 8 कोटी रुपये घेतात. आलिया एका जाहिरातीसाठी 1 ते 2 कोटी रुपये घेते. परंतु इतकं असूनही रणबीरची संपत्ती आलियापेक्षा जास्त आहे.या लग्नानंतर या पतीपत्नीची एकूण संपत्तीजवळपास 500 कोटी इतकी झाली आहे. आलियाला महागड्या गाड्यांचीही आवड आहे. अभिनेत्रीकडे अनेक कार आहेत. अभिनेत्रीच्या सर्वात महागड्या कारबद्दल बोलायचे तर ती रेंज रोव्हर वोग आहे, ज्याची किंमत सुमारे 2 कोटी रुपये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात