जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आणखी एक वेगळी भूमिका घेऊन येतोय 'श्री', लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

आणखी एक वेगळी भूमिका घेऊन येतोय 'श्री', लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

shashank ketkar

shashank ketkar

स्टार प्रवाह वाहिनीने (Star Pravah ) ‘पिंकीचा विजय असो’ या नव्या मालिकेनंतर आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज केला आहे. विशेष म्हणजे या मालिकेत मराठी कलाविश्वातील सर्वांचा लाडका अभिनेता झळकणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जानेवारी: नवीन वर्षात मनोरंजनाच्या(entertainment) रेसमध्ये टिकण्यासाठी प्रत्येक मराठी वाहिनी प्रयत्न करत आहेत. सध्या मराठी टीव्हीसृष्टीत अनेक बदल घडून येत आहेत. काही जुने चेहरे पुन्हा आले, तर अनेक नवीन कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अनेक मराठी वाहिन्यांनी नवीन वर्षाचे निमित्त साधत अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. दरम्यान, स्टार प्रवाह वाहिनीने (Star Pravah ) ‘पिंकीचा विजय असो’ या नव्या मालिकेनंतर आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलिज केला आहे. विशेष म्हणजे या मालिकेत मराठी कलाविश्वातील सर्वांचा लाडका अभिनेता झळकणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीने नुकतंच ‘मुरांबा’(muramba) या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. नुकतचं स्टार प्रवाहनं कसा मुरणार प्रेमाचा हा आंबट-गोड मुरांबा? असा सवाल करत ‘मुरांबा’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितलं. यामध्ये मुख्य भूमिकेत लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर(Shashank Ketkar) दिसत आहे. मात्र, दोन अभिनेत्री दाखवण्यात आल्या आहेत, त्यांच्या नावाचा अद्याप उलगडा झालेला नाही.

जाहिरात

ही नवी मालिका 14 फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही नवी मालिका यंदा नव्या चेहऱ्याला घेऊन मालिकाविश्वात उतरली आहे. मालिकेच्या प्रोमोवरून प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात येणार असल्याचे समजते. ‘पिंकीचा विजय असो’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला नुकतीच आली आहे. मालिकेतील शरयू सोनावणे या नवोदित अभिनेत्रीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेच्या प्रोमोमधील तिचा अंदाज प्रेक्षकांना आवडला आहे. खरतंर टीव्ही विश्वात शशांक केतकरला झी मराठी वाहिनेन लाँच केले होते. त्याने आत्तापर्यंत झी वाहिनीसाठी काम केले होते. शशांक हा ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचला होता. त्या मालिकेतील त्याची ‘श्री’ची भूमिका आजवर प्रेक्षकांच्या मनात आहे. तेव्हा त्याच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं. त्यानंतर शशांक ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हा…’ , ‘पाहिले न मी तुला’या मालिकांमध्ये दिसला होता. याशिवाय ‘३१ दिवस’, ‘आरॉन’, ‘वन वे तिकीट’ या चित्रपटातदेखील तो झळकला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात