आलियाने आपला अल्ट्रासाउंड रूममधील फोटो शेअर करत प्रेग्नन्सीची माहिती (Alia Bhatt announces pregnancy) सर्वांना दिली होती. “अवर बेबी.. कमिंग सून” असं कॅप्शन तिनं आपल्या फोटोला दिलं होतं. हेही वाचा - Alia Bhatt pregnancy: आलियाच्या गुड न्यूजनंतर कंडोम कंपनीची अफलातून पोस्ट VIRAL! या फोटोमध्ये तिच्यासोबत रणबीरही होता. यानंतर काही वेळातच या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. आलियाची आई सोनी राझदान (Soni Razdan), सासू नीतू कपूर, वहिनी रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor) या सर्वांनी आपापल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून त्यांना शुभेच्छा दिल्या. आलियाचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत आपला आनंद व्यक्त केला. “माझ्या बाळाला आता बाळ होणार आहे, रणबीर आणि आलियासाठी मी खूप खूश आहे. माझं कुटुंब मोठं होत आहे, आणि मला आता आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या भूमिकेसाठी – आजोबा होण्यासाठी - तयार व्हायचं आहे. हा एक ग्रँड डेब्यू असेल!” अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.View this post on Instagram
रणबीर आणि आलियानं या वर्षीच्या एप्रिल महिन्यात लग्नगाठ बांधली होती. यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत प्रेग्नन्सीची घोषणा केल्यामुळे सोशल मीडियावर याबाबत मीम्स शेअर केले जात आहेत. ‘वर्षाच्या आत पाळणा हलवण्याची परंपरा कायम ठेवली’ अशा मिश्किल पोस्टमधून लोक या दाम्पत्याला शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, या दोघांचा ब्रह्मास्त्र (Brahmastra) सिनेमा हा 9 सप्टेंबर 22 रोजी रिलीज होणार असून या निमित्ताने आलिया-रणबीर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood News, Entertainment, Pregnancy, Ranbir kapoor