मुंबई 27 जून: कपूर खानदानात एका नव्या ज्युनियर कपूरची एंट्री होणार ही बातमी आल्यापासून (Alia Bhatt announces pregnancy) आलिया भट्टच्या इन्स्टाग्रामवर अक्षरशः शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. अगदी नवं लग्न झालेल्या या जोडप्याने (Ranbir Alia marriage) एवढ्या लवकर ही गुड न्यूज दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आलियाने आज स्वतःच्या सोशल मीडियावरून (Alia Bhatt new instagram post) ही बातमी शेअर केल्यावर फॅन्सना उधाण आलं आहे. पण या सगळ्यात एका कंडोम कंपनीने आलिया-रणबीरला दिलेल्या शुभेच्छा जबरदस्त चर्चेचा विषय ठरत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपण आई होत असल्याची बातमी शेअर करत एक पोस्ट टाकली आहे. त्यात तिने लिहिलं होतं, …. त्यानंतर अगदी लाखोंच्या आकड्यात पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडू लागला आणि काहीच वेळात ड्युरेक्स नावाच्या लोकप्रिय कंडोम कंपनीने एक अप्रतिम आणि क्रिएटिव्ह पोस्ट शेअर करत या कपलला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा सध्या एवढ्या पसंत केल्या जात आहेत की आलियाच्या गुड न्यूजपेक्षा याचीच चर्चा जास्त होताना दिसत आहे. ‘महफिल में तेरी हम तो क्लिअरली नहीं थे’ अशी पोस्ट ड्युरेक्स कंपनीने केली आहे. रणबीरच्याच एका सुपरहिट गाण्याच्या ओळी बदलून एकदम भन्नाट पद्धतीने या कंडोम कंपनीने आपल्या शुभेच्छा नव्याने आई-बाबा होणाऱ्या जोडीला दिल्या आहेत. ड्युरेक्स कंपनी आपल्या हटके कन्टेन्ट साठी कायम ओळखली जाते.
आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक नवीन जुन्या महत्त्वाच्या घडामोडींवर आपल्या हटके शब्दात टिप्पणी करणं आणि त्याजोगे जाहिरात करणं यात ड्युरेक्सचा हातखंडा आहे. त्यांच्या पोस्ट कायमच चर्चेचा विषय असतात. आणि आता या नव्या पोटावर सुद्धा अगदी भरभरून कमेंट्स येत आहेत. हे ही वाचा- Alia Bhatt Pregnant : ‘दीड वर्षातच आलिया-रणबीर…’; कपलने Good News देताच ज्योतिषांनी केली मोठी भविष्यवाणी आलियाने आपल्या पोस्टमध्ये ती, रणबीर आणि अल्ट्रासाऊंड मशीन असलेला एक फोटो शेअर केला आहे. यात ती बेडवर झोपलेली असून त्या मशिनकडे पाहत आहे असं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सिंहाचं एक कुटुंब दिसत असून सिंहीणी सिंहाकडे प्रेमाने बघत आहे आणि त्यांचा नवजात छावा सुद्धा त्यात दिसत आहे. या पोस्टवर बॉलिवूडच्या अनेक तारेतारकानी शुभेच्छा दिल्या आहेत.