मुंबई, 25 जुलै: अभिनेत्री आलिया भट्ट मागचे काही महिने एकाहून एक सप्राइज घेऊन येत आहे. एकीकडे आलियाच्या सिनेमांची चर्चा सुरू असताना आलियानं लग्न केलं आणि त्यानंतर आलिया आई होणार असल्याची गोड बातमी तिनं चाहत्यांना दिली. तर दुसरीकडे आलिया आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. आलिया भट्टची निर्मिती असलेला पहिला वहिला ‘डार्लिंग्स’ हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी ‘डार्लिंग्स’ या बहुप्रतिक्षित सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ब्लॅक कॉमेडी ड्रामा असलेला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर येत्या 5 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत आहे. तर अभिनेत्री शेफाली शाह आलियाच्या आईच्या भूमिकेत आहे. आलिया आणि शेफालीसह डार्लिंग्स सिनेमात अभिनेता विजय वर्मा, मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर, अजित केळकरही महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. विजय वर्मा आलिया भट्टच्या नवऱ्याची भूमिका साकारणार आहे. मिस्ट्री, ड्रामा, सस्पेंसने भरलेला हा परिपूर्ण सिनेमा असणार आहे. आलिया आणि शेफाली शाह यांची आई मुलीची डार्लिंग जोडी पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. ‘निर्माती म्हणून माझा पहिला सिनेमा. मी फार उत्साही आहे आणि नाराजही आहे. थ्रील इमोशनसह डार्लिंग्सचा ट्रेलर तुमच्याबरोबर शेअर करत आहे’, असं म्हणत आलियाने सोशल मीडियावर सिनेमाचा ट्रेलर शेअर केला आहे’.
हेही वाचा - Sneha Wagh: बिग बॉसनंतर स्नेहा वाघ झळकणार ‘या’ हिंदी मालिकेत; साकारणार खलनायिकेची भूमिका डार्लिंग्सच्या ट्रेलरमध्ये भरपूर ड्रामा पाहायला मिळत आहे. ट्रेलरची सुरुवातच हमजा म्हणजेच विजय वर्माने होते. तो त्याची पत्नी बदरुनिशावर म्हणजेच आलियावर खूप प्रेम करतो पण तिला सोडून जाताना दिसतो आहे. त्यानंतर बदरुनिशा तिच्या आईला घेऊन नवरा हरवल्याची तक्रार करण्यासाठी पोलिसात जाते. ट्रेलर पुढे जाताच आलिया आणि तिच्या आईनेच तिच्या नवऱ्याला किडनॅप केल्याच समोर येतं. बदरुनिशा तिच्या नवऱ्याला रश्शीने बांधून त्याला प्रचंड मारहाण करताना दिसत आहे. तिची आई तिला नवऱ्याला उंदीर मारण्याचं औषध देण्यास सांगते. पण बदरुनिशाला नवऱ्याला मरताना नाही तर तडफडताना पाहायचं आहे. नवऱ्यानं बदरुनिशाबरोबर असं काय केलं ज्याचा बदला घेण्यासाठीत ती नवऱ्याबरोबर असं वागते या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना 5 ऑगस्टलाच मिळणार आहे. आलियाचं निर्मिती क्षेत्रातील हे पदार्पण असलं तरी गौरी खान, आलिया भट्ट, गौरव वर्माही सिनेमाचे निर्माते आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डार्लिंग्स सिनेमा नेटफ्लिक्सने 75 करोड रुपयांचा विकत घेतला आहे. आलियाने बॅक टू बॅक अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षकही सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.