मुंबई, 25 जुलै: ‘काटा रुते कुणाला’ या मराठी मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी मराठीमोळी अभिनेत्री म्हणजे ‘स्नेहा वाघ’. या मालिकेतून स्नेहा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. त्यानंतर बिग बॉस मराठी सीझन 3 मधून स्नेहा वाघ पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजनवर दिसली. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर स्नेहा वाघला बऱ्याच महिन्यांनी मोठा ब्रेक मिळाला असून स्नेहा पुन्हा एका हिंदी टेलिव्हिजनवर दिसणार आहे. स्टार भारत वाहिनीवरील ‘ना उम्र की सीमा हो’ या नव्या मालिकेत स्नेहा खलनायिकेची भूमिका साकारणार आहे. मालिकेत ‘अम्बा’ हे पात्र स्नेहा साकारणार असून तिच्या नव्या कामानिमित्त तिचे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘ना उम्र की सीमा हो’ या मालिकेत अभिनेत्री स्नेहा वाघसह अभिनेत्री रचना मिस्री आणि इक्बाल खान हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. स्नेहासह आणखी दोन मराठी कलाकार या मालिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री समिधा गुरू आणि वर्षा दंडाले प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘ना उम्र की सीमा हो’ ही मालिका 26 जुलै पासून स्टार भारतवर पाहायला मिळणार आहे. हेही वाचा - kiran Mane: ‘अन् एका सेकंदाच्या आत खाडकन… ‘; किरण मानेंनी सांगितली बहिणीबरोबरची ती आठवण अभिनेत्री स्नेहा वाघ बिग बॉस मराठीमुळे चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या लग्नाच्या विषयावरुन अनेक वाद विवाद समोर आले होते. बिग बॉसमधून बाहेर येताच स्नेहानं प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. त्यानंतर ती एका रिअलिटी शोचं निवेदन करणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र तिला टेलिव्हिजनवर मालिकांमध्ये काम करायची इच्छा तिने व्यक्त केली होती. अखेर बिग बॉस संपल्यानंतर स्नेहाला नवी मालिका मिळाली असून तिला पुन्हा टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी तिचे चाहते आतूर आहेत.
स्नेहाच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं तर आता ‘ना उम्र की सीमा हो’ या मालिकेतून पुन्हा प्रेक्षाकांच्या भेटीला तर येणारच आहे. मात्र त्याआधी स्नेहानं ‘काटा रुते कुणाला’ या मराठी मालिकेत तसेच ‘मेरे साई’, ‘चंद्रगुप्त मौर्य’, ‘एक वीर की अर्दास वीर’ या हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. दरम्यान मधल्या काळात स्नेहा वाघ तिच्या लग्नामुळेही चांगलीच चर्चेत आली होती. अभिनेता आविष्कार दार्वेकर बरोबर झालेल्या घटस्फोटानंतर स्नेहा वाघने त्याच्यावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर तिने अनुराग सोलंकीबरोबर लग्न केलं मात्र तेही फार काळ टिकू शकलं नाही. बिग बॉसमध्ये येताच स्नेहाच्या दोन्ही लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. तिचा पहिला नवरा आविष्कार देखील बिग बॉसमध्ये असल्यानं दोघांच्या नात्याविषयी अनेक प्रश्न विचारले गेले होते.