TikTok चॅलेंज दिल्यानं दीपिका पुन्हा वादात, VIRAL VIDEO वरुन जोरदार टीका

TikTok चॅलेंज दिल्यानं दीपिका पुन्हा वादात, VIRAL VIDEO वरुन जोरदार टीका

TikTok इन्फ्लूएन्सरला छपाक लुकचं चॅलेंज दिल्यानं दीपिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : अभिनेत्री दीपिका पदुकोण मागच्या काही काळापासून चर्चेत आहे. तिचा छपाक सिनेमा नुकताच रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. पण सिनेमा रिलीज होण्याआधी जेएनयूतील विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानं दीपिका वादात सापडली होती. त्यावेळी काहींना तिला पाठिंबा दिला होता तर काहींनी मात्र बॉयकॉट छपाक असा हॅशटॅग वापरत सोशल मीडियावर दीपिकाला विरोध केला होता. त्यानंतर आता TikTok इन्फ्लूएन्सरला छपाक लुकचं चॅलेंज दिल्यानं दीपिका पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका एका टिकटॉक इन्फ्लूएन्सरला छपाक सिनेमाच्या लुकचं चॅलेंज देताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे दीपिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दीपिकाच्या या चॅलेंजला संवेदनाहीन, मूर्खपणा आणि पब्लिसिटीचा सर्वात वाईट प्रकार असल्याचं म्हटलं जात आहे.

प्रियांका आणि निक यांची रोमँटिक क्लिप VIRAL; फक्त शर्टमध्ये रोमान्स करताना दिसले

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या 39 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये दीपिका मेकअप आर्टिस्ट फॅबी हिला स्वतःच्या तीन सिनेमांचे लुक रिक्रिएट करण्याचं चॅलेंज देताना दिसत आहे. या व्हिडीओत फॅबी सर्वात आधी दीपिकाचा पहिला सिनेमा ओम शांति ओम(2007) आणि त्यानंतर पिकू(2015) चे लुक रिक्रिएट करताना दिसते आणि सर्वात शेवटी ती छपाक सिनेमाचा अ‍ॅसिड अ‍ॅटॅकवाला लुक रिक्रएट करते. तिच्या या लुक वरुनच दीपिकावर खूप टीका केली जात आहे.

अनेकांनी दीपिकावर अ‍ॅसिड अ‍ॅटॅकच्या दुःखाची सिनेमाच्या लुकशी तुलना केल्याचा आरोप केला आहे. तर अनेकांनी तिच्या असं करण्यानं सिनेमा करण्याच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका युजरनं लिहिलं, जेएनयूमध्ये जाऊन दीपिकानं लक्ष्मीच्या दुःखाची कमी खिल्ली उडवली होती का जे आता या पीडितांवर अशाप्रकारे टिकटॉक व्हिडीओ तयार करण्याचं चॅलेंज करत आहे.

मलंगच्या सेटवर HOT बिकिनीमध्ये दिसली दिशा! सेक्सी लूकने चाहत्यांना केले घायाळ

दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, हा अ‍ॅसिड अ‍ॅटॅक पीडितांचा अपमान आहे. स्वतःचा प्रचार करण्यासाठी दीपिका पदुकोण आणखी किती खालच्या पातळीला जाणार आहे. मेघना गुलजार यांच दिग्दर्शन असलेला छपाक हा सिनेमा दिल्लीच्या लक्ष्मी अग्रवालच्या रिअल लाइफ स्टोरीवर आधारित आहे. हा सिनेमा 10 जानेवारीला रिलीज झाला होता.

आयुष्मानने घातलेल्या नोजपिनची चर्चा, नव्या सिनेमात दिसला शर्टलेस लुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2020 09:25 AM IST

ताज्या बातम्या