मुंबई, 27 सप्टेंबर : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 3 ) यंदाचा सीजन सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. यामध्ये एक अशा चेहरा आहे की, तो सर्वांना आवडत आहे. हा चेहरा म्हणजे अक्षय वाघमारे याचा आहे. घरात प्रत्येकाचे कुणासोबत ना कुणासोबत दररोज खटके उडत आहे. अशात अक्षय वाघमारे याची खेळ खेळण्याची शांत स्टाईल सर्वांना आवडत आहे. त्याच्या खेळाची महेश मांजरेकर यांनी देखील कौतुक केले. आता लवकरच अक्षय वाघमारेचं (Akshay Waghmare New Romantic Song Coming Soon) एक नवं कोरं रोमॅण्टिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बिग बॉसच्या घऱातून तर अक्षयने सर्वांचे मन जिंकलेच आहे पण या गाण्याच्या माध्यमातून देखील तो प्रेक्षकांचे मन जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
अक्षय वाघमारे याच्या या नवीन गाण्याचे नाव ‘हळवेसे’ असं आहे. या गाण्याचे चित्रीकरण मुळशी इथं करण्यात आले आहे. या गाण्यातून सानिया निकम ही नवोदित अभिनेत्री दिसणार आहे. या गाण्यात काम करण्याच्या अनुभाविषयी अक्षयने सांगितले आहे की,या गाण्याची सर्व टीम उत्साही असल्या कारणाने हे गाणे करताना खूप मजा आली. हे माझे पहिलेच रोमॅण्टिक गाणे असल्याने या गाण्याबद्दल मला कमालीची उत्सुकता असल्याचे त्याने सांगितले.
वाचा : Bigg Boss Marathi च्या घरात गायत्री दातार पडली प्रेमात, I Love You म्हणत दिला Kiss
‘हळवेसे’ या गाण्याचा निर्माते श्रीनिवास यांनी देखील गाण्याविषयी बोलताना सांगितले, या गाण्यासाठी माझ्या डोक्यात पहिल्यापासून अक्षय वाघमारे याचेचे नाव होते. तर अभिनेत्री म्हणून मी सानिया निकम हिचे ‘मन हे वेडे’ गीताचे इंस्टाग्रामवर रील पाहून निवड केल्याची त्यांनी सांगितले.
View this post on Instagram
अक्षय संत, देवश्री आठल्ये व जीवन मराठे यांनी हे गाणे लिहिले आहे. तर स्वप्नील सावंत व जीवन मराठे यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. साहिल सहा यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. श्रीनिवास कुलकर्णी व मधुसूदन कुलकर्णी हे या गाण्याचे निर्माते आहेत. आता अक्षयच्या या नव्या गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देत आहेत हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Bigg boss marathi