जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सोनाली कुलकर्णीच्या Reel एक्सप्रेशन्स पाहूण नॅशनल क्रशलाही विसराल...

सोनाली कुलकर्णीच्या Reel एक्सप्रेशन्स पाहूण नॅशनल क्रशलाही विसराल...

सोनाली कुलकर्णीच्या Reel एक्सप्रेशन्स पाहूण नॅशनल क्रशलाही विसराल...

सध्या सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) हिचे देखील एक इन्स्टा रील (Sonalee Kulkarni Instagram Reel) व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या रीलमध्ये सोनाली विविध एक्सप्रेशन्स देताना दिसते आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 सप्टेंबर : सध्य सगळीकचे इन्स्टा रीलचे (Instagram Reel) वारे जोरात वाहत आहे. जो तो उठतोय आणि इन्स्टावर रील करत असतो. आता यामध्ये आपले मराठी कलाकार देखील मागे नाहीत. मराठी कलाकारांचे विविध रील सध्या सोशल मीडियावर चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)  हिचे देखील एक इन्स्टा रील (Sonalee Kulkarni Instagram Reel)  व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या रीलमध्ये सोनाली विविध एक्सप्रेशन्स देताना दिसते आहे. सोनालीने तिच्या इन्स्टावर व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, यापैकी तुम्हाला कोण आवडली. चाहत्यांनी देखील पटापट कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये सोनाली खूपच क्यूट दिसत आहे. यामध्ये सोनाली वेगवेगळ्या इमोजीप्रमाणे एक्सप्रेशन्स देताना दिसते आहे.  कधी सॅड तरी कधी आनंदी अशी एका क्षणात सोनाली चेहऱ्याचे हावभाव बदलताना दिसत आहे. यामध्ये तिने एक्सप्रेशन्स क्वीन म्हणजी आपली सर्वांची लाडकी नॅशनल क्रश असलेली रश्मिका मंदाना हिला देखील मागे टाकले असल्याचे दिसत आहे. वाचा : Bigg Boss Marathi च्या घरात गायत्री दातार पडली प्रेमात, I Love You म्हणत दिला Kiss अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 7 मे रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.

जाहिरात

यानंतर सोनाली पती कुणालसोबत मालदिवला गेली होती. यावेळी तिने पतीसोबतचे काही रोमॅंटिक फोटो शेअर केले होते. या फोटोत सोनालीने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली होती. तिच्या या लूकची सोबत तिच्या मंगळसूत्राची देखील त्यावेळी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात