मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /''मुलगी झाली हो....'' आलिया-रणबीरच्या घरी चिमुकल्या पावलांची एन्ट्री

''मुलगी झाली हो....'' आलिया-रणबीरच्या घरी चिमुकल्या पावलांची एन्ट्री

alia bhatt

alia bhatt

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आई बनल्याची गोड बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आज सकाळी तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता बातमी येतेय ती आलीयाच्या आई होण्याची.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आई बनल्याची गोड बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आज सकाळी तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता बातमी येतेय ती आलीयाच्या आई होण्याची. तिने मुलीला जन्म दिला असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता हे बॉलिवूडचे क्यूट कपल आता एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत.या बातमीमुळे कपुर घरात आनंदाचं वातावरण आहे. तसेच त्यांचे फॅन्स देखील या बातमीने आनंदीत आहेत. लोकांनी सोशल मीडियावर एकमेकांना शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. हॉस्पिटलमध्ये आलियाला भेटायला आलियाची आई सोनी राजदान आणि नितू कपूर देखील पोहोचल्या आहेत.

आज सकाळी प्रसिद्ध पापाराझी विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर आलिया आणि रणबीरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये आलिया आणि रणबीर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल होताना दिसून आले होते. हे जोडपं आलिया भट्टच्या प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलं होतं. रणबीर-आलिया आज सकाळी 7.30 वाजता रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. पोस्ट शेअर करत पापाराझींने लिहलं होतं, '#aliabhatt आणि #RanbirKapor आज सकाळी 7.30 वाजता गिरगावातील अंबानी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी पोहोचले आहेत. आलिया भट्ट प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल आहे. ही बातमी जोरदार व्हायरल झाली होती. दरम्यान आता आलिया भट्टने लेकीला जन्म दिल्याची गोड बातमी समोर आली आहे.

(हे वाचा:जान्हवी कपूरच्या रुमर्ड बॉयफ्रेंडचं नक्की चाललंय काय?; आता बोनी कपूरला मारली मिठी )

आलिया आणि रणबीर एका गोंडस लेकीचे आईबाबा बनले आहेत. त्यामुळे कपूर आणि भट्ट फॅमिलीमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. हे दोन्ही कुटुंबीय सध्या मुलीच्या स्वागताने प्रचंड आनंदी झाले आहेत. बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट्टने लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यांनंतरच आपल्या घरी छोटा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली होती. जूनमध्ये आलियाने सोनोग्राफी रुममधून एक फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. आलिया आणि रणबीर आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुक होते. आज सकाळी रणबीर-आलिया मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलबाहेर दिसून आले होते. आणि आता हे दोघ एका लेकीचे आईबाबा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

आलिया भट्ट-रणबीर कपूर लग्न-

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यावर्षी एप्रिलमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले होते. विशेष म्हणजे लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर, या अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाउंटवर सोनोग्राफी रुममधील फोटोशेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. या फोटोद्वारे तिने आपल्या चाहत्यांना प्रेग्नेंसीची गोड बातमी दिली होती. या फोटोमध्ये रणबीर कपूरदेखील उपस्थित होता. आलियाने हा गोड फोटो शेअर करत लिहिलं होतं की - "आमचं बाळ लवकरच येणार आहे." ही पोस्ट समोर येताच जोरदार व्हायरल झाली होती. चाहते आणि सेलिब्रेटींनी या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुक होते. या दोघांनी आधीपासूनच बाळाच्या स्वागताची संपूर्ण तयारी केली होती. आलिया आणि रणबीरने या काळात बाळाच्या संगोपनासाठी अनेक पुस्तकेसुद्धा वाचली होती. दरम्यान आता मुलीच्या जन्माने भट्ट आणि कपूर कुटुंबात जल्लोष होत आहे. एकेएक करत सर्व कुटुंबीय हॉस्पिटलमध्ये दाखल होता आहेत.

First published:
top videos

    Tags: Alia Bhatt, Ranbir kapoor