मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Koffee With Karan 7: कतरिनाच्या लग्नाआधी करण-आलियाने नशेत विकीसोबत केलं होतं असं काही...ऐकून सर्वच चकित

Koffee With Karan 7: कतरिनाच्या लग्नाआधी करण-आलियाने नशेत विकीसोबत केलं होतं असं काही...ऐकून सर्वच चकित

 करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण 7' सध्या प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. शोच्या प्रत्येक सीजनप्रमाणे हा सीजनसुद्धा प्रचंड चर्चेत आहे.

करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण 7' सध्या प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. शोच्या प्रत्येक सीजनप्रमाणे हा सीजनसुद्धा प्रचंड चर्चेत आहे.

करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण 7' सध्या प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. शोच्या प्रत्येक सीजनप्रमाणे हा सीजनसुद्धा प्रचंड चर्चेत आहे.

    मुंबई, 18 ऑगस्ट-   करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण 7' सध्या प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. शोच्या प्रत्येक सीजनप्रमाणे हा सीजनसुद्धा प्रचंड चर्चेत आहे. याठिकाणी लोकप्रिय बॉलिवूड सेलिब्रेटी आपले सिक्रेट्स शेअर करताना दिसून येत आहेत. या आठवड्यात शोमध्ये अभिनेता विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा उपस्थिती लावणार आहेत. या भागाचा प्रोमोही समोर आला आहे. येत्या भागात करण जोहर विकी आणि कतरिनाच्या लग्नाआधी घडलेला एक रंजक किस्सासुद्धा शेअर करणार आहे. सध्या करण जोहर 'कॉफी विथ करण'च्या सातव्या सीजनसह परतला आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड-साऊथ कलाकार उपस्थिती लावताना दिसून येत आहेत. हे सेलिब्रेटी व्यावसायिकच नव्हे तर आपल्या खाजगी आयुष्याबाबतही मोठं-मोठे खुलासे करतांना दिसून येत आहेत. या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्राला पाहता येणार आहे. नुकतंच या एपिसोडचा एक मजेशीर प्रोमोही रिलीज झाला आहे. यामध्ये करण सिद्धार्थ मल्होत्राला कियारासोबत लग्न करणार का? असा प्रश्न विचारतांनासुद्धा दिसून येत आहे. सोबतच या एपिसोडमध्ये करण जोहर स्वतः एक मोठा खुलासा करताना पाहायला मिळणार आहे. आणि हा खुलासा कतरिना आणि विकी यांच्याबाबत असणार आहे.या घटनेबाबत सांगताना करणने म्हटलं, 'एकदा मी आणि आलिया नशेत होतो. आम्ही दोघे वाईन पीत होतो. त्यावेळी आमच्या मनात आलं आम्ही कोणाला फोन करावा? नंतर आम्ही विकी कौशलचा नंबर डायल केला'. हा किस्सा कतरिना आणि विकीच्या लग्नाच्या काही दिवस आधी घडला होता. या दोघांच्या लग्नाच्या बातमीने आपण भावुक झाल्याचं करण सांगतो. हा संपूर्ण किस्सा आज रात्री डिस्ने हॉटस्टारवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी या एपिसोडची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून आहे. (हे वाचा: 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला करायचंय स्वयंवर; कार्तिक आर्यन ते विजय देवरकोंडा होणार सहभागी? ) विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचं लग्न प्रचंड चर्चेत आलं होतं. या दोघांनी लग्नाची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नव्हती. परंतु मीडियाला याची भनक लागली होती. या दोघांनी कडेकोट बंदोबस्तात आपलं लग्न उरकलं होतं. कतरिना आणि विकीचं लग्न 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील हॉटेल सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे झालं होतं. दोघांनी आपलं लग्न अत्यंत खाजगी पद्धतीने उरकलं होतं. या दोघांच्या लग्नाला काही जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Alia Bhatt, Bollywood, Entertainment, Karan Johar, Katrina kaif, Vicky kaushal

    पुढील बातम्या