जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bigg Boss Marathi 3 मध्ये अरुण गवळीच्या जावयाची चर्चा ; काय आहे दादा कोंडकेंशी कनेक्शन ?

Bigg Boss Marathi 3 मध्ये अरुण गवळीच्या जावयाची चर्चा ; काय आहे दादा कोंडकेंशी कनेक्शन ?

Bigg Boss Marathi 3 मध्ये अरुण गवळीच्या जावयाची चर्चा ; काय आहे दादा कोंडकेंशी कनेक्शन ?

बिग बॉसच्या घऱातील एक नाव चांगलेच चर्चेत आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा (Arun Gawli) जावई अक्षय वाघमारे याच्या नावाची बिग बॉसच्या घऱात व घराबाहेर चर्चा रंगली आहे. तुम्हाला माहिती आहे का त्याचे नाव का चर्चेत आहे ? तसेच त्याचे दादा कोंडके (Dada Kondke )यांच्यासोबत काय कनेक्शन आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 सप्टेंबर 202: सध्या सगळीकडे ‘बिग बॉस’ मराठीच्या (Bigg Boss Marathi 3) सीजन तीनची चर्चा सुरू आहे. वादग्रस्त असणारा हा शो लोकप्रिय देखील तितकाच आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरात काय झालं, कोणाचा वाद झाला, टास्कमध्ये कोण जिंकणार..पहिल्या आठवड्यात घऱातून बाहेर कोण पडणार याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या सगळ्या राड्यात बिग बॉसच्या घऱातील एक नाव चांगलेच चर्चेत आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीचा  (Arun Gawli) जावई अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) याच्या नावाची बिग बॉसच्या घऱात व घराबाहेर चर्चा रंगली आहे. तुम्हाला माहिती आहे का त्याचे नाव का चर्चेत आहे ? तसेच त्याचे दादा कोंडके **(Dada Kondke )**यांच्यासोबत काय कनेक्शन आहे. अक्षय वाघमारे व्यवसायाने मॉडेल आहे. अक्षय वाघमारे याचा जन्म 1988 मध्ये मुंबईत झाला. मुंबईतच त्याने शिक्षण पूर्ण केले. मॉडेल कॉलेजमधून त्याने कॉम्प्युटर सायन्समध्ये डिग्री घेतली आहे. त्यानंतर त्याने पुण्यातून मास्टर्सही केले आहे. 219मध्ये अक्षय वाघमारेला ‘हॉटेस्ट मॅन ऑफ द मराठी टीव्ही’ हा किताब मिळाला आहे. वाचा : भाग्यश्री मोटेने शरीराच्या ‘या’ भागावर गोंदवला ‘महामृत्युंजय मंत्र’; नेटकऱ्यांनी केलं भयंकर TROLL अक्षयने अरुण गवळीची मुलगी योगिता हिच्याशी 2020 मध्ये बांधली लग्नगाठ अक्षयने अरुण गवळीची मुलगी योगिता हिच्याशी मे 2020 मध्ये लग्नगाठ बांधली आहे. हे लग्न गवळीचा बालेकिल्ला असलेल्या दगडी चाळीमध्ये झाले. या लग्नाला फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यच उपस्थित होते. 7 मे 2021रोजी अक्षय आणि योगिताला एक गोड मुलगी झाली आहे.

जाहिरात

दादा कोंडके यांच्यासोबत आहे खास कनेक्शन अक्षय वाघमारे हा ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांचा नातू लागतो. अक्षयची आजी दादा कोंडके यांची बहीण होती. अक्षय वाघमारेने आतापर्यंत फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यांसारख्या मराठी सिनेमांत काम केले आहे.

अक्षयने  किचनाचा ताबा मिळाल्यानंतर  अन्नाचा  केली नासाडी बिग बॉस मराठीच्या घरात अक्षय वाघमारेने किचनमध्ये घातलेल्या राड्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. बिग बॉसच्या घराच सर्व काही मोजून मापून मिळते. त्यामध्ये किचन साहित्याचा देखील समावेश असतो. म्हणूनच बऱ्याचवेळा या घऱात जेवणावरून वाद देखील होतात. अक्षयने देखील किचनाचा ताबा मिळाल्यानंतर अन्नाचा नासाडी केली आहे. ज्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात