मुंबई, 24 सप्टेंबर 2021 ; मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyshree Mote tatoo) सोशल मीडियावर नेहीमच हॉट आणि बोल़्ड फोटोमुळे चर्चे असते. नुकताच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर एक टॅटू गोंदवला आहे. याचा फोटो देखील तिने इन्स्टाग्रामवर (Instagram viral) शेअर केला आहे. विशेष म्हणजे या टॅटूमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. भाग्यश्रीने तिच्या इन्स्टावर टॅटू गोंदवल्याचा (Tatoo below breast) तिचा फोटो शेअर केला आहे. यासोबतच हा तिचा हा पहिला टॅटू असल्याचं तिने सांगितलं आहे. हा टॅटू पाहताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. महामृत्युंजय मंत्र भाग्यश्रीने शरीराच्या भागावार गोंदवून घेतला आहे. शरीराच्या ज्या ठिकाणी हा टॅटू काढला आहे त्यावरून तिला ट्रोल केलं जात आहे.
वाचा : गौतमी देशपांडे घेतेय ट्रेकिंगचा आनंद; सुंदर Reel शेअर करत जिंकलं चाहत्यांचं मन
भाग्यश्रीने तिच्या कंबरेच्या वरच्या व ब्रेस्टच्या काहीसे खालच्या भागामध्ये महामृत्युंजय मंत्राचा टॅटू गोंदवून घेतला आहे. हा टॅटू पाहिल्यावर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. मात्र, टॅटू काढण्यासाठी तिने निवडलेली जागा पाहून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ‘महामृत्युंजय मंत्रासारखा पवित्र मंत्र शरीरावर गोंदवून घेताना लाज वाटली पाहिजे’, अशी टीका अनेक नेटकऱ्यांनी तिच्या या टॅटूवर केली आहे.
भाग्यश्री मोटेने शरीराच्या ‘या’ भागावर गोंदवला ‘महामृत्युंजय मंत्र’; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
सध्या सोशल मीडियावर अनेक कलाकार कपड्यावरून तर कधी मेकअपवरून, अशा विविध कारणावरून ट्रोल होत असतात. अनेक कलाकार या ट्रोलर्सचा समाचार देखील घेतात. आता भाग्यश्री या सगळ्यावर काय बोलते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. भाग्यश्री मोटेने ‘काय रे रास्कला’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे देखील चर्चेत असते.

)







