अक्षय कुमारचा बहुचर्चित 'लक्ष्मी बॉम्ब' देखील OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, कोट्यवधी रुपयांना विकले राइट्स

अक्षय कुमारचा बहुचर्चित 'लक्ष्मी बॉम्ब' देखील OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार, कोट्यवधी रुपयांना विकले राइट्स

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'लक्ष्मी बॉम्ब' (Laxmi Bomb) हा चित्रपट देखील OTT वर प्रदर्शित होणार आहे

  • Share this:

मुंबई, 29 मे : कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी देशभरात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनचा परिणाम बॉलिवूड इंडस्ट्रीवर देखील झाला आहे. चित्रपट प्रदर्शन थांबल्यामुळे अनेक निर्माते, सिनेमागृहांचे मालक, चित्रपट प्रदर्शनाच्या प्रक्रियेसाठी लागणारी संपूर्ण टीम या सर्वच घटकांवर लॉकडाऊनचा नकारात्मक परिणाम झाला आहे. दरम्यान बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांनी यावेळी ओटीटी (Over the top) प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे. अमिताभ-आयुष्मानचा 'गुलाबो सिताबो' (Gulabo Sitabo), विद्या बालनचा 'शकुंतला देवी' (Shakuntala Devi) हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. आता या चित्रपटांच्या यादीमध्ये आणखी एका बहुप्रतिक्षित सिनेमाचं नाव जोडलं गेले आहे. अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'लक्ष्मी बॉम्ब' (Laxmi Bomb) हा चित्रपट देखील OTT वर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अक्षय कुमारबरोबर कियारा अडवाणी स्क्रीन शेअर करत आहे.

(हे वाचा-सारा अली खानला भिकारी समजून लोकांनी दिली होते पैसे, मजेशीर VIDEO व्हायरल)

पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या निर्णयाबाबत सुरूवातील काही वेगवेगळी मतं होती, मात्र आता चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित करण्यासंदर्भात सर्वांची सहमती आहे. अक्षय कुमारचा हा बहुचर्चित सिनेमा 22 मे रोजी प्रदर्शित होणार होता, आज सर्वकाही सुरळीत असतं तर आता हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये असता. अशावेळी चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की जर सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे तर यासंदर्भात अधिकृत घोषणा अद्याप का करण्यात आली नाही आहे.

याबाबत अशी माहिती मिळते आहे की, अद्याप या चित्रपटाचे काही काम बाकी आहे. याकरता साधारण एक महिना जाईल. त्यामुळे याचे निर्माते लॉकडाऊन संपण्याची वाट पाहत आहेत. जेणेकरून या सिनेमाचे उर्वरित काम पूर्ण होईल आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करता येईल. मुंबईमध्ये कोरोनाची वाढती भीती लक्षात घेता याठिकाणी तरी लॉकडाऊन संपल्यानंतर सुद्धा सिनेमागृहं सुरू करण्यास परवानगी मिळेल अशी शक्यता नाही. परिणामी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या चित्रपटाचे राइट्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर 125 कोटींना विकण्यात आले आहेत.

First published: May 29, 2020, 11:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या