मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /आदिराजला विसरून मीरा निखिलशी लग्न करणार?; Ajunhi Barsat Ahe मध्ये नवा ट्विस्ट

आदिराजला विसरून मीरा निखिलशी लग्न करणार?; Ajunhi Barsat Ahe मध्ये नवा ट्विस्ट

'अजूनही बरसात आहे' (Ajun hi Barsat Ahe ) मालिकेत निखिलने मीराला लग्नाची मागणी घातली आहे.

'अजूनही बरसात आहे' (Ajun hi Barsat Ahe ) मालिकेत निखिलने मीराला लग्नाची मागणी घातली आहे.

'अजूनही बरसात आहे' (Ajun hi Barsat Ahe ) मालिकेत निखिलने मीराला लग्नाची मागणी घातली आहे.

मुंबई, 28 सप्टेंबर ; 'अजूनही बरसात आहे' (Ajun hi Barsat Ahe ) या मालिकेतून (Marathi serial) अभिनेता उमेश कामत (Umesh kamat) आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta barve) ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या दोघांच्याही अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या मालिकेतील या दोघांच्यातील वाद तर कधी प्रेम पाहायला प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या दोघांनी एकत्र यावे, लवकर लग्नगाठ बांधावी अशीच चाहत्यांची इच्छा आहे. मालिका सध्या एका विशिष्ट वळणावर आहे. आता या मालिकेत निखिलने मीराला लग्नाची मागणी घातली आहे.

अजूनही बरसात आहे मालिकेत नवीन ट्वीस्ट (Ajun hi Barsat Ahe New Twist) आला आहे. सोनी मराठी वाहिनीने इन्स्टावर 'अजूनही बरसात आहे' या मालिकेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये निखिल मीराला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. निखिल मीराला लग्नाची मागणी घालताना म्हणत आहे की, आपल्या नात्याला एक छान आणि वेगळे नाव देऊ या..माझ्याशी लग्न करशील का ? ..असं विचारताच मीराच्या चेहऱ्यावर हासू दिसत आहे.

नेमका त्याचवेळी आदिराज त्या ठिकाणी येतो. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचे हवभाव पाहण्यालायक असे आहेत. यावर मीरा काय उत्तर देणार तसेच यामुळे आदिराज काय निर्णय घेणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

हे वाचा - ऋतुजा बागवेचा 'तो' Photo पाहून 'या' अभिनेत्रीने तिला घातली लग्नाची मागणी

निखिलच्या प्रपोजलला मीरा हो देणार का? ती आदिराजसोबत पुन्हा नाते जोडणार का ? पुन्हा एकदा आदिराज आणि माराचे प्रेम फुलणार का असा प्रश्न सध्या प्रेक्षकांना सतावत आहे. प्रेक्षकांनी देखील मीराने या प्रपोजलला नकार द्यावा अशीच इच्छा सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. तसेच काहींनी मीरा निखिलला नकार देणार असा विश्वास व्यक्त केला आहे. हा भाग 29 सप्टेंबरला सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

 हे वाचा -  महेश मांजरेकरांचा bigg boss marathi लुक पाहून नेटकऱ्यांना झाली 'या' राजकीय नेत्याची आठवण!

तब्बल आठ वर्षानी या मालिकेच्या माध्यमातून उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोघांनी यापूर्वी चित्रपटांबरोबरच नाटकांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. लग्न पाहावे करून या चित्रपटात देखील मुक्ता आणि उमेश यांनी एकत्र काम केलं आहे. आता या मालिकेच्या माध्यमातून पुन्हा ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत.

First published:
top videos

    Tags: Marathi entertainment, Mukta barve, Sony tv, Tv serial, TV serials