जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / महेश मांजरेकरांचा bigg boss marathi लुक पाहून नेटकऱ्यांना झाली 'या' राजकीय नेत्याची आठवण!

महेश मांजरेकरांचा bigg boss marathi लुक पाहून नेटकऱ्यांना झाली 'या' राजकीय नेत्याची आठवण!

महेश मांजरेकरांचा bigg boss marathi लुक पाहून नेटकऱ्यांना झाली 'या' राजकीय नेत्याची आठवण!

सध्या महेश मांजरेकर यांचा Bigg Boss Marathi साठीचा लुक भलत्याच चर्चेत आहे. (Mahesh Manjrekar Look ) हा लुक पाहून महाराष्ट्रातील एका राजकीय नेत्यासोबत तुलना केली आहे. तुम्हालाही वाटतं का हे ‘त्यांच्या’सारखे दिसतात?

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 सप्टेंबर : सध्या ‘बिग बॉस मराठी सिझन 3’ **(Bigg Boss Marathi 3 )**प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाचा सीजन देखील चांगलाच गाजत आहे. यंदा बिग बॉस मराठीची विकेंडला म्हणजे आठवड्याच्या शेवटी सर्वांची चावडी भरते. या चावडीचे प्रमुख असतात सर्वांचे लाडके होस्ट महेश मांजरेकर. या चावडीवर महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar Look ) बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व स्पर्धकांची शाळा घेतात. कोण चुकले असेल तर त्याचे कान टोचतात. तर कोणी चांगली कामगिरी केली असेल तर त्याची न चुकता महेश मांजरेकच पाठ देखील थोपटतात. सध्या महेश मांजरेकर यांचा बीबी लूक म्हणजे यंदाच्या बिग बॉस मराठीमधील लूक नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. नेटकऱ्यांना महेश मांजरेकरांचा हा लूक पाहून महाराष्ट्रातील एका राजकीय (Chhagan Bhujbal Look) नेत्यासोबत तुलना केली आहे. सध्या बिग बॉसच्या चावडीचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी महेश मांजरेकर यांची तुलना ही नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी केली आहे. नेटकऱ्यांच्या मते दोघंही एकदम सेम टू सेम दिसत आहेत. वाचा : स्नेहा भडकली मीनलवर! म्हणाली, ‘Bigg Boss Marathi च्या घरात माझ्या एवढं कोणीच…’ पाहा VIDEO पांढरी शुभ्र दाढी आणि मिशा… पांढरे केस व डोळ्यावर काळ्य रंगाचा चष्मा तसेच गळ्यात काळ्या रंगाचा मफलर असा काहीसा लूक महेश मांजरेक यांचा आहे. छगन भुजबळ यांचा लूक देखील नेहमी असाच असतो. भुजबळ यांच्या लूकची तसेच त्यांच्या मफलरची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगलेली असते. बिग बॉस मराठीच्या निमित्ताने महेश मांजरेकर यांच्या लूकमुळे नेटकऱ्यांना देखील या लूकची आठवण झाली आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओ खाली काही कमेंट करून देखील सांगितलं आहे.

जाहिरात

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला आहे की, “मला तर वाटलं भुजबळच आहेत की काय.” दुसरा नेटकरी म्हणाला आहे की, ‘मला वाटलं छगन भुजबळ इकडे कसे काय.” तिसरा नेटकरी म्हणाला आहे की, “सेम टू सेम छगन भुजबळ साहेब.” आणखी एक नेटकरी म्हणाला आहे की, “आम्ही तर भुजबळ साहेबांना बघायला आलो.” यानंचर दुसरा नेटकरी म्हणाला आहे की, “मला वाटले छगन भुजबळच आलेत होस्ट म्हणून!” अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात